दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती (अंजनगाव सुर्जी):-अंजनगाव सुर्जी येथून जवळ असलेल्या लखाड येथील सुधाकर नाभाजी लबडे यांनी १९६५ साली जागा विकत घेतली, परंतु बाजूच्या शेख मूर्तिब यांनी २८ गुंठे शेताची जागा विक्री करून प्लॉट पाडले आहेत.त्या ठिकाणी तेथील रहिवाशांनी अतिक्रमण केल्यामुळे जाण्या-येण्याचा सरकारी रस्ता बंद झाला.त्यामुळे ग्रामस्थ सुधाकर लबडे यांनी तहसील कार्यालयासमोर दि.१२ मार्च पासून उपोषण सुरू केले आहे.तरी तातडीने सरकारी रस्ता मोकळा करून द्यावा,अशी मागणी उपोषणकर्ते सुधाकर लबडे यांनी केली आहे.
उपजिल्हाधिकारी कार्यालय,अमरावती महसूल विभागाअंतर्गत उपविभागीय अधिकारी दर्यापूर यांना पत्र प्राप्त झाले असून अवैध शेतात लेआऊट पाडले असून त्यांचेवर दंडात्मक कार्यवाही करण्यात यावी व उपोषण कर्त्याची समस्या सोडवून त्यांना जाण्या-येण्याचा रस्ता तहसीलदार यांनी त्वरित मोकळा करून द्यावा असे पत्र लबडे यांना देण्यात आले आहे.
