दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त १४ एप्रिल शुक्रवार रोजी इर्विन चौकात अभिवादनासाठी हजारो अनुनियांची मोठी गर्दी होणार आहे.त्यामुळे हा मार्ग दिवसभर वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद राहील.अभिवादन करण्यासाठी येणाऱ्यांची गर्दी व विविध शोभायात्रा या दिवशी इर्विन चौक येथे येतात.त्यामुळे मुख्य समारंभाच्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस विभागाच्या वतीने नियोजन करण्यात आले आहे.
इर्विन चौकातील वाहतूक दुसऱ्या पर्यायी मार्गाने वळविण्यात आली असून इर्विन चौक ते खापर्डे बगीचा,जिल्हा परिषद कन्या शाळा ते इर्विन चौक,बाबा कॉर्नर ते इर्विन चौक,मर्क्युरी टि पॉइंट ते इर्विन चौक या मार्गाचा उपयोग करण्यात येईल.मालवीय चौक हा मार्ग सर्वच प्रकारच्या वाहनांकरिता बंद ठेवण्याचा निर्णय पोलीस विभागाने घेतला आहे.तसेच मर्क्युरी टी पॉइंट ते इर्विन,वाहतूक पोलीस कार्यालय,होलिक्रॉस शाळा या मार्गावर वाहन पार्किंग करण्याकरिता सक्त मनाई करण्यात आली आहे.
इर्विन चौक ते खापर्डे बगीचा मार्गावरील वाहतूक मध्यवर्ती बस स्थानक मार्गाने जिल्हा परिषद कन्या शाळेकडून येणारे वाहन पोलीस पेट्रोल पंप मार्गाने बाबा कॉर्नर मार्गावरील वाहतूक करणाऱ्या वाहनांना शिव रेल्वे स्थानक ते बस स्थानक,जयस्तंभ चौक,दीपक चौक ते चौधरी चौक,जयस्तंभ ते रेल्वे स्थानक या मार्गाचा वाहनधारकांना उपयोग करता येईल.दरम्यान मुस्लिम बांधवांचा रमजान हा पवित्र महिना सुरू असल्याकारणाने लागणाऱ्या वस्तू खरेदीसाठी इतवारा चौक मार्गावर १५ ते २२ एप्रिल या कालावधीत मीना बाजार भरविण्यात येईल. या ठिकाणी होणारी गर्दी लक्षात घेता या मार्गावरील वाहतूक आठ दिवसांकरिता इतर पर्यायी मार्गाने वळविण्यात आल्याने हे मार्ग वाहतुकीसाठी आठवडाभर बंद राहतील.
