दैनिक चालु वार्ता मुखेड प्रतिनिधी – शिवकुमार बिरादार
मुखेड
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळास राज्य शासनाने आज दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली. आमदार डॉ. तुषार राठोड यांनी मुदत वाढीसाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून आज दुपारी सभापती एड. खुशालराव पाटील उमरदरीकर यांनी ज्येष्ठ नेते गंगाधरराव राठोड साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत सभापती पदाचा पदभार स्वीकारला आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाची मुदत संपल्याने बाजार समिती कायद्यातील तरतुदीनुसार निर्वाचित संचालक मंडळास एक वर्षापर्यंत मुदतवाढ देण्याची तरतूद सदर कायद्यात आहे यानुसार राज्य सरकारने आज एका आदेशान्वये विद्यमान संचालक मंडळास दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. यापूर्वीही आमदार डॉ.तुषार राठोड यांच्या पाठपुराव्याने सहा महिन्यासाठी मुदतवाढ दिली होती . ही मुदत दिनांक 26 नोव्हेंबर 2022 रोजी संपली संपल्याने आज दुसऱ्यांदा शासनाने एका आदेशान्वये बाजार समिती संचालक मंडळास मुदतवाढ दिली आहे.
दरम्यान मध्यंतरीच्या काळामध्ये शासनाने सदर बाजार समितीवर शासनाचा प्रतिनिधी प्रशासक म्हणून नियुक्त केला होता. बाजार समिती कायद्यातील तरतुदीनुसार दुसऱ्यांदा सहा महिन्यासाठी संचालक मंडळास मुदतवाद मिळावी म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाने शासनाकडे प्रस्ताव पाठविला होता आमदार डॉ. तुषार राठोड यांच्याकडे मुदत वाढीची मागणी ही संचालक मंडळाने केली होती. त्या अनुषंगाने आमदार डॉ. तुषार राठोड यांनी शासनाकडे पाठपुरावा करून सदर संचालक मंडळात दुसऱ्यांदा मुदतवाढ मिळवून दिली आहे. दरम्यान आज दुपारी संचालक मंडळाच्या वतीने सभापती खुशालराव पाटील उमरदरीकर यांनी बाजार समितीच्या कार्यालयात सभापतीपदाचा पदभार स्वीकारला.
यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा माजी नगराध्यक्ष गंगाधरराव राठोड यांनी सभापती एड. खुशालराव पाटील उमरदरीकर व संचालक मंडळाचा यथोचित सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती लक्ष्मण पाटील खेरकेकर ,भाजपाचे जिल्हा सरचिटणीस डॉ. माधव पाटील उच्चेकर जिल्हा परिषदेचे माजी सभापती व्यंकटराव पाटील चांडोळकर , ज्येष्ठ नेते हनमंतराव मस्कले , व्यंकटराव लोहबंदे , उपसभापती डॉ. व्यंकटराव सुभेदार , संचालक पंडितराव सूर्यवंशी, नागोराव पाटील श्रीरामे , दत्ता पाटील मुधळे , विठ्ठलराव पाटील कोहिनूरकर , लतीफ पठाण सदाशिव पाटील जाधव, भाजपा कार्यकर्ते विनोद दंडलवाड , राजू घोडके, उत्तम बनसोडे , महावीर शिवपुजे ,अंतेश्वर पाटील बिल्लाळीकर, वेंकटराव जाधव वसूरकर , हनुमंत नरोटे, किशोर मस्कले, कल्याण पाटील आखरगेकर, डी.एस. गोपनर, शिवाभाऊ समराळे, व्यापारी मनोज शेठ जाजू, गोपाळ सावकार पत्तेवार, नागनाथ कोटीवाले, किशोर मस्कले, सुधीर चव्हाण, समीर गजगे आदीसह बहुसंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
या मुदतवाढीमुळे आमदार डॉ. तुषार राठोड यांचे तालुक्यातील सहकार क्षेत्रावर पुनश्च एकदा वर्चस्व सिद्ध झाले आहे. विद्यमान सभापती एडवोकेट खुशालराव पाटील उमरदरीकर यांनी आगामी काळातील बाजार समिती निवडणूक आमदार तुषार राठोड यांच्या नेतृत्वाखाली लढवून सर्वच्या सर्व संचालक निवडून आणून पुन्हा एकदा बाजार समितीवर भाजपाचा झेंडा फडकविण्याचा निर्धार यावेळी बोलताना व्यक्त केला. आणि संचालक मंडळाला मदत वाट दिल्याबद्दल आमदार डॉ. तुषार राठोड साहेब यांचे संचालक मंडळाच्या वतीने जाहीर आभार व्यक्त केले.
