
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे
मंठा बाबासाहेबांनी उच्च शिक्षणाद्वारे समता स्वातंत्र्य बंधुभाव ही मानवी मूल्य स्वीकारलेला एक स्वाभिमानी आधुनिक समाज निर्माण करायचा या हेतूने डॉ बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक चळवळीचा खरा मूलधार सर्वसामाजिक दुखण्यावर एकमेव उपाय शोधला तो म्हणजे उच्च शिक्षण हेच औषध आहे.
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर एक विचाराचा अग्णी त्यांच्या कर्तत्वाने लंडन अमेरिका सारखे बलाढ्य देशांमध्ये २०० वर्षांमध्ये असा विद्यार्थी आलेला नाही म्हणूनच तर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हटले जातेसर्व स्तरातील घटक महामानवाची गुणगान गात १३२ वी जयंती उत्सव साजरा करत असताना मंठा येथे प्रबोधन करताना प्राध्यापक सिद्धार्थ पानवाले म्हणाले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड भरत कुमार अवसरमोल, पोलीस निरीक्षक संजय देशमुख, डॉ आर.एस. गायकवाड डॉ प्रताप चाटसे यांची उपस्थिती होती पंचरंगी ध्वजारोहण ज्येष्ठ नेते रावसाहेब खरात यांच्या हस्ते करण्यात आले. उपस्थित धम्म बांधवांना संबोधित करताना पानवले म्हणाले संकल्प करूया महामानवाच्या विचारावर कृतीवर आणि आचरणावर चालण्याचा फार महत्त्वाचे असून डॉ बाबासाहेब आंबेडकर विचारानेच आपल्या देशाचा उद्धार होणार.पांढरा शुभ्र वस्त्र परिधान करून भीम अनुयायांनी भीम गर्जनेसह मंठा शहर दुमदुमून सोडले.लाठी काठी, लेझीम पथक , मुख्यरस्त्या मार्गे डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक पर्यंत येऊन रॅलीचे रूपांतर एका विशाल सभेमध्ये झाले. सभापती छाया अरूण वाघमारे यांच्या वतीने उपस्थित मान्यवरांना संविधान पुस्तिका देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी आमदार राजेश राठोड सतीश भाऊ निर्वळ, राजेश मोरे,बाळासाहेब बोराडे बोराडे जेके कुरेशी नितीन राठोड बाज का पठाण प्रसाद बोराडे विकास सूर्यवंशी रंगनाथ बापू वाटाणे डॉ धोंडोपंत मानवतकर ॲड अनिल मोरे,दत्तराव चोरमारे,ॲड सिद्धार्थ अवसरमोल, समाजामधील सर्व जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य ग्रामपंचायत सदस्य यांची उपस्थिती होती तर १३२ व जयंती उत्सव आनंद द्विगुणित करण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती मंठा , सारनाथ युथ यांनी श्रम घेतले..