दैनिक चालू वार्ता भुम प्रतिनिधी
भूम:-राज्याचे आरोग्यमंत्री तथा धाराशिव चे पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त ना. प्रा. डॉ. तानाजीराव सावंत युवा मंच महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत यांचा श्रीफळ, पुष्पगुच्छ , मानाची शाल देऊन सन्मान करण्यात आला. तसेच श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिर कोल्हापूर येथे राज्याचे आरोग्य मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजीराव सावंत यांनी दर्शन घेतले व आलमप्रभू देवस्थान येथे धनंजय सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त ना.प्रा.डॉ.तानाजीराव सावंत युवा मंच यांच्यावतीने फळे वाटप करण्यात आली. यावेळी युवा सेना शहर प्रमुख तथा ना.प्रा. डॉ. तानाजीराव सावंत युवा मंच चे अध्यक्ष प्रभाकर शेंडगे, मुकेश भगत पाटील , रोहित भडके ,अमर भगत ,अमोल भसाड ,श्री ज्योतिबा देवस्थानचे पुजारी सुरज ठाकरे ,गणेश ठाकरे ,विनोद अनभुले ,वैभव साळूंखे महावीर रांजवन आदी पदाधिकारी उपस्थित होते.
