दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
सोलापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र सावता महाराज तीर्थक्षेत्र अरण संत शिरोमणी सावता महाराजांच्या संजीवनी समाधीच्या चंदन उटी सोहळ्या सोमवार दिनांक १७ तारखेला सकाळी ११:३० वाजता रोजी मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. या सोहळ्यात अनेक जिल्ह्यातून माळी समाज पुणे जिल्ह्यासह समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन सावता परिषदेचे प्रदेश मुख्य संघटक संतोष राजगुरू यांनी केले आहे. जर वर्षी उन्हाळ्यात उन्हाळ्याची दहाकता कमी व्हावी म्हणून संत शिरोमणी सावता महाराजांच्या समाधी चंदन लावण्यात येते याला चंदनउटी सोहळा म्हणतात या सोहळ्यानिमित्त पंढरपूर येथील स्वामी नामानंद महाराज सेवा श्रमाचे मताधिपती ह. भ. प. दया घन महाराजांचे सावता महाराज यांच्या जीवन चरित्रावर हरिकीर्तन होणार आहे त्यांना पैठण येथील स्वरानंद शिक्षण संस्थेचे भजन सम्राट ह. भ. प. सदानंद मगर महाराज संगीत साथ देणार आहेत संत शिरोमणी सावता महाराज संजीवनी समाधीसह पांडुरंगाच्या मूर्तीसह चंदनउटि लावून लावण्यात या भव्य सोहळ्यास राज्यातील भक्त मंडळींनी व माळी समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन चंदनउटी सोहळ्याचे संयोजक सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे साहेब सह सावता परिषदेचे प्रदेशाध्यक्ष मयूर वैद्य प्रदेश महासचिव गणेश दळवी प्रदेश उपाध्यक्ष महादेव ताटे गणेश मुख्य संघटक संतोष राजगुरू महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष मनीषाताई सोनमाळी युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष एडवोकेट गोपाळ बुरबुरे महाराष्ट्र उपाध्यक्ष राहुल जावळे पुणे महानगरचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील कोद्रे पुणे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष गोरक्ष भुजबळ पिंपरी चिंचवड महानगरचे जिल्हाध्यक्ष चेतन वाघमारे पिंपरी चिंचवड महिला आघाडीच्या महानगरपालिका पुनम ताजने पुणे महानगरच्या जिल्हाध्यक्ष गदादे ताई उपाध्यक्ष सोनल जगताप ,इंदापूर तालुका अध्यक्ष प्रकाश नेवसे जिल्हा उपाध्यक्ष राहुल ननवरे, युवक आघाडीचे तालुकाध्यक्ष अमर बोराटे ,अनुज गायकवाड, प्रज्वल राऊत सुरज भुजबळ श्रेयस मोहोळकर सचिन शिंदे अजय गवळी यांनी आव्हान केले आहे.
