दैनिक चालु वार्ता वाढोणा प्रतिनिधी-
उदगीर तालुक्यातील वाढोणा- एकुर्का पांदण रस्ता नजीक
गट नं 435 कलकोटे यांच्या शेतातून गुडसुर फीडर मेनलाईन पोल जागेवर वाकडा झाला आहे व तारा जमिनी पर्यंत आलेला दिसत आहेत विधुत प्रवाह चालू आहे तरी मोठा अपघात होऊ शकतो या कडे महावितरण चे अधीकारी यांनी जातीने लक्ष देऊन पुढील अनर्थ टाळावा अशी मागणी वाढोणा येथील गावकरी करीत आहेत. पुढील मनुष्यहानी अथवा जनावरांची हानी होऊ नये या साठी महावितरण उदगीर यांनी तात्काळ लक्ष देऊन पुढील संकट टाळावे
