
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
लोहा येथील भीम जयंतीत लोहा न.पा.ने मुलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल लोहा न.पा.चे कर्तव्यदक्ष लोकप्रिय लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती मंडळ लोहाच्या वतीने मी जाहीर आभार मानतो असे प्रतिपादन भीमजंयती म़डळाचे अध्यक्ष बालाजीराव खिल्लारे यांनी केले आहे.
लोहा लोहा येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त लोहा शहरातील मुख्य रस्त्यावरील खड्डे चुरीने बुजविले , भीम जयंतीच्या मिरवणूक मार्गावर विशेष १०० विद्युत पोल लावून त्यावर फोकस लाईट लावून विद्युत रोषणाई केली. तसेच दोन ठिकाणी थंड व शुध्द फिल्टर पिण्याच्या पाण्याची सोय केली. तसेच भीमजयंती ची मिरवणूक यशस्वी करण्यासाठी स्वतः नगराध्यक्ष व न.पा. चे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. त्याबद्दल सार्वजनिक भीम जयंती मंडळाच्या वतीने भीमजयंती मंडळाचा अध्यक्ष म्हणून सर्वांच्या वतीने लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांचे मी आभार मानतो असे प्रतिक्रिया २०२३ लोहा सार्वजनिक भीम जयंती मंडळाचे अध्यक्ष बालाजी राव खिल्लारे यांनी दिली.