
दैनिक चालु वार्ता वाशीम प्रतिनिधी – वसंत खडसे
वाशिम : कोरोना सारख्या महामारीच्या परिस्थितीत केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर संपूर्ण देशातील अनेक पत्रकारांवर अतिशय बिकट असा प्रसंग वाढवला होता. त्यापैकी अनेकांवर ओढवलेल्या संकटाचा याची देही..! याची डोळा..!! अनुभवणारा मी स्वतः साक्षीदार असून, उभ्या दुनियेच्या समस्या सर्वांन समोर मांडणारा पत्रकारच बिकट अशा समस्यांच्या गर्ततेत अडकल्याचे पाहून मन अस्वस्थ व बेचैन झाले होते. आणि त्या अस्वस्थतेतून व बेचैनीतूनच पत्रकार व पत्रकारितेत काम करणाऱ्या बांधवांसाठी कुठेतरी एक हक्काचं व्यासपीठ असावं, ही संकल्पना सुचली आणि काही समविचारी सहकाऱ्यांच्या मदतीने आईस ऑफ मीडियाचा उदय झाला. आणि पाहता, पाहता ही केवळ नावापुरती संघटना न राहता, पत्रकारिते काम करणाऱ्यांचा एक देशव्यापी परिवार झाला असल्याचे प्रतिपादन हाईस ऑफ मीडियाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी केले. ते नागपूर येथे पार पडलेल्या व्हॉईस ऑफ मीडियाच्या विदर्भस्तरीय अधिवेशनाच्या प्रथम सत्रात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
पुढे बोलताना राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे म्हणाले, कोरोना काळात अनेकांच्या चुली विझण्याची परस्थितीती निर्माण झाली होती. कारण या बिकट काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या तर, कित्येकांच्या नोकरीवर, रोजगारावर टांगती तलवार होती. अशा परिस्थितीत उभं आयुष्य पत्रकारितेत घालवणाऱ्या प्रत्येक पत्रकाराने कसं जगायचं. त्यामध्ये कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण, घरातील वयोवृद्धाचे, योग्य संगोपन, आजारपण आदी अनेक प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी पत्रकारांच्या व पत्रकारितेत काम करणाऱ्यांच्या समस्या शासन दरबारी प्रखरपणे मांडण्यासाठी पत्रकारांच्या हक्काची एक मजबूत संघटना हवी म्हणून, व्हॉईस ऑफ मीडिया चा जन्म झाला. जे काम, दहा वर्षात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले होते ते काम, अवघ्या दीड ते दोन वर्षातच पूर्ण झाले आहे. याचे संपूर्ण श्रेय हे दिवसागणिक वाढत चाललेल्या व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रत्येक सदस्याचे असल्याचे काळे म्हणाले. व्हॉईस ऑफ मीडिया ही वेगवेगळ्या विंगच्या माध्यमातून संपूर्ण देशात व्यापली असून,केवळ घोषणा आणि आश्वासने देणारी संघटना नव्हे; तर कृतिशील कार्यक्रम राबवून केलेला संकल्प पूर्णत्वास नेणारा एक परिवार आहे. म्हणूनच, अवघ्या दोन महिन्याच्या कालावधीत साडेपाच हजाराच्या वर पत्रकारांचा विमा काढणारी व्हॉईस ऑफ मीडिया ही देशातील पहिली संघटना असल्याचे स्वाभिमानाने सांगावे वाटते.