
दैनिक चालु वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
लातूर /अहमदपूर:- एप्रिल महिना महामानवाच्या जयंतीचा महिना, महामानवाच्या जयंतीचा महिना एप्रिल महिना.या एप्रिल च्या महिन्यामध्ये चार महामानवांच्या जयंत्या असतात.
11 एप्रिल ला महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती असते. 14 एप्रिल ला महामानव प्रज्ञाशूर्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असते. 22 एप्रिल ला महात्मा बसवेश्वर यांची जयंती असते आणि 30 एप्रिल ला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती असते. या महामानवांच्या आणि भारतातील अनेक महामानवांच्या विचारातून आणि कृतीतून महाराष्ट्राची आणि भारताची जडणघडण झालेली आहे.
या महामानवांच्या विचारांची आणि योगदानाची चळवळ पुढे चालू राहावी म्हणून छत्रपती शाहू राजे योगा ग्रुप अहमदपूर पुरोगामी साहित्य परिषद अहमदपूर आणि पे बॅक टू सोसायटी प्रोग्राम महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समितीच्या सभागृहामध्ये दिनांक 16 एप्रिल 2023 रोजी राज्यस्तरीय कवी संमेलनाचे आयोजन दुपारी 12:30 ते 4:30 या वेळेमध्ये राज्यस्तरीय कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. मराठीच्या ख्यातनाम कवयित्री माननीय वर्षा माळी मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कवी संमेलनाचे उद्घाटक महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध साहित्यिक आणि कवी भारत सातपुते यांनी केले या कवी संमेलनाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध कवी गझलकार माननीय राजसाहेब कदम यांनी केले.
पे बॅक टू सोसायटी प्रोग्रामचे नॅशनल सेक्रेटरी प्राध्यापक धीमंत महेंद्र थोरात पे बॅक टू सोसायटी प्रोग्रामचे महाराष्ट्राचे ट्रेनिंग ऑपरेशनचे कन्व्हेनर अशोक भाऊ राठोड पे बॅक टू सोसायटी प्रोग्राम जे चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष गौतम वावरे ,
महाराष्ट्र मध्ये बहुजनवादी चळवळ पुढे नेणारे गोरगरिबांच्या हक्कासाठी झटणारे ज्यांना महाराष्ट्र शासनाने दलित मित्र ही पदवी देऊन ज्यांना भूषवलेलं आहे असे उत्तम माने साहेब हे या कवी संमेलनाचे प्रमुख पाहुणे होते
या राज्यस्तरीय कवी संमेलनाचे स्वागत अध्यक्ष महाराष्ट्राचे ख्यातना विद्रोही कवी आणि साहित्यिक राजेंद्र कांबळे यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले तत्पूर्वी महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात करून त्यांच्या कार्यास अभिवादन करण्यात आले
प्रमुख पाहुण्यांनी महामानवांचे कार्य समाजासाठी कसे तारक आहे आणि आजही समाज त्यांच्या आदर्शावर चालतो आहे असे त्यांच्या वक्तव्यातून सांगितले
पाच तास रंगलेल्या या कवी संमेलनात कवींनी महापुरुषावरील कविता सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली त्यामध्ये कवी ज्ञानेश्वर हंडरगुळीकर कवि चंद्रकांत मोरे कवी आबा पांचाळ कवी लक्ष्मण सूत वसमत कवी मदन अंभोरे वसमत एस एन नाईकवाडे उदगीर शोभा चव्हाण औसा डॉक्टर सुशील कुमार चिमुरे व्यंकट सूर्यवंशी उदगीर कवी माधव जाधव कंधार अनुरत्न वाघमारे नांदेड कवी अंकुश उदगीर उदगीर कवी बालाजी मुंडे किनगाव कवी बालाजी मुंडे चिखलीकर कवी शिवा कराड कवी प्राध्यापक संजीव कुमार भोसले, कवी शिवकांता शिंदे विजय पवार नांदेड वैजनाथ गीते प्राध्यापक अनिल चवळे प्राध्यापक भगवान अमलापुरे प्राध्यापक तुकाराम हरगिले कवयित्री मीना तोर कवयित्री रंजना गायकवाड मुरहारी कराड शिवाजी नामप ले कवी संजय तिडके कवी गणेश चव्हाण कवी शिवाजी स्वामी उदगीर कवी शाहीर सुभाष साबळे कवी वैजनाथ कांबळे हाडोळती डॉक्टर रमाकांत गजलवार दैवशाला गुरव औसा एन डी राठोड राजेंद्र कांबळे राजेसाहेब कदम पत्रकार बाबासाहेब वाघमारे सौरव जगळपुरे सुनिता मोरे लातूर सुनीता मोरे लातूर यांनी आपल्या बहारदार कविता सादर करून या कवी संमेलनात रंगत घडवून आणली. कवी संमेलनाचे बहारदार सूत्रसंचालन महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी आणि सुप्रसिद्ध गजलकार राजसाहेब कदम यांनी केले सुप्रसिद्ध कवयित्री वर्षा माळी यांनी या रंगलेल्या कवी संमेलनाचे अध्यक्षीय भाषण केले त्यामध्ये त्यांनी एकूण 70 महामानवांच्या यादीच वाचन केलं आणि त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली या कवी संमेलमध्ये प्रमुख पाहुणे यांनी महामानवाबद्दल गौरव उद्गार काढले त्याबाबतही कवयित्री वर्षा माळी यांनी त्यांचे अभिनंदन केले आणि सर्व कवींनी अत्यंत चांगल्या पद्धतीने कविता सादर करून येथील प्रेषकामध्ये चांगले वातावरण निर्माण केल्याबद्दल त्यांचेही आभार मानले. महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार आणि कला पुष्प अकादमीचे अध्यक्ष श्री चंद्रशेखर भालेराव यांनी त्यांच्या सुंदर कुंचल्या मधून आकर्षक बॅचेस तयार करून दिल्या त्याबद्दल कवी संमेलनाच्या अध्यक्षा वर्षा माळी यांनी त्यांचेही आभार मानले
महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध साहित्यिक आणि पे बॅक टू सोसायटी प्रोग्राम साहित्य शाखेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष एन डी राठोड यांनी या राज्यस्तरीय कवी संमेलनाचे प्रास्ताविक केले आणि आभार पीबीएसपी महाराष्ट्राचे ट्रेनिंग ऑपरेशनचे प्रमुख श्री अशोक राठोड यांनी केले