
दैनिक चालू वार्ता निलंगा प्रतिनिधी -इस्माईल महेबूब शेख
==================
निलंगा: तालुक्यातील काही भागातील मागील काही दिवसा पुरुवी गारपीट झाली असून गारपीट मुळे ज्वारी.करडी.असे अनेक पिकाचे नुकसान झाले होते तरी शासनाच्या आदेशाने पंचनामे करण्यासाठी तलाठी निबालकर मनोज हे चनाची वाडी या गावामधे आले होते पण तलाठी साहेबांनी पंचनामे न करता सरसकट नुकसान भरपाई देण्यात येणार आहे असे सागितले होते परंतु तलाठी साहेबांनी शेती मध्ये न जाता गावामधील जवळच्या मित्राच्या घरी बसून मित्राच्या सागण्यावर गावातील काही जवळील लोकांचे नावे घेतली आहे व नोद करून घेतली आहे एवढेच नाही तर तलाठी साहेबांनी
ज्या शेतकऱ्यांनी जवारीच पेरली नाही त्या शेतकऱ्याची ज्वारी पेरली अशी नोंद घेण्यात आली आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी ज्वारी पेरली आहे त्याची नोंद घेतली नाही असे बरेच शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित राहणार आहेत असे दिसून येत आहे ज्या शेतकऱ्याची नोंदच घेतली नाही किंवा प्रत्यक्ष पाहणी केलीच नाहीअसे शेतकरी अंकुश सगरे. अनिल धोंडीराम सगरे. नागनाथ विठ्ठल सगरे. अंबादास मोहन कदम. संभाजी मोहन कदम. वसंत भोसले. दत्तात्रय सगरे. प्रल्हाद भाऊसाहेब पाटील. इंद्रजीत साधू सगरे.. असे अनेक शेतकरी आहेत तरी या शेतकऱ्यांचे तहसीलदार साहेबांनी स्वतः लक्ष घालून फेर पंचनामे करावे अशी शेतकऱ्याची मागणी आहे.