
दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी- बाजीराव गायकवाड
नांदेड/कंधार :-कंधार येथील महाराणा प्रतापसिंग चौक ते जाधव हॉस्पिटल पर्यंत रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी तसेच झालेले अतिक्रमण काढण्यात यावे अशी मागणी कार्यकारी अभियंता नांदेड व जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे मागणी केली आहे.महाराणा प्रतापसिंग चौक ते जाधव हॉस्पिटल हा रस्ता शंभर फुटाचा आहे रस्त्यांच्या दोन्ही बाजूंनी अतिक्रमण झाले असल्याने हा रस्ता शंभर फुटावरून वीस फुटावर येऊन पोहोचला आहे तरी या रस्त्यावर दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलेले आहे व हा रस्ता दोन्ही तालुक्याला जोडणारा मुख्य रस्ता असून या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रहदारी आहे.या रस्त्यावर चालणाऱ्या लोकांना आपला जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे तरी हा रस्ता शंभर फुटाचा करून देऊन रहदारी साठी येणारी अडचण दूर करावी अशी मागणी माहिती अधिकार तपास समिती मराठवाडा उपाध्यक्ष व्यंकटराव जाधव. पांडुरंग कंधारे यांनी कार्यकारी अभियंता साहेब नांदेड व जिल्हाधिकारी साहेब नांदेड यांच्याकडे केली आहे