
दैनिक चालु वार्ता जालना प्रतिनिधी-आकाश माने
जालना शहरातील एका विवाहित तरुणाने आपल्याच लहान मेहुणी सोबत संतापजनक कृत्य केले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
जालना, 19 एप्रिल : गेल्या काही दिवसांपासून राज्यात महिलांवरील अत्याचारांचं प्रमाण वाढलं आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांविरोधात तातडीने कठोर पाऊलं उचलण्याची मागणी केली जात आहे. अशातच जालना जिल्ह्यातून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. येथील एका विवाहित तरुणाने आपल्याच लहान मेहुणीवर शारीरिक अत्याचार केले आहेत. शारीरिक अत्याचार करणाऱ्या तरुणाला जालन्याच्या पिंक मोबाइल पथकाने अटक केली.
बलराम जयसिंग शिंगने असं अटक करण्यात आलेल्या 30 वर्षीय नराधम तरुणाचे नाव आहे. तो शहरातील रोहणवाडी परिसरात राहतो. शहरातील हनुमानघाट परिसरातील 19 वर्षीय तरुणीचे देऊळगावराजा तालुक्यातील एका तरुणासोबत लग्न झाले आहे. मात्र, लग्नानंतर त्या तरुणीच्या पतीला त्याच्या साडूने म्हणजे तिच्या मोठ्या बहिणीचा नवरा बलराम शिंगने याने फोन केला. मला तुझी बायको खूपच आवडते. तू तिला सोडून दे, असे म्हणत बलरामने त्याच्या साडूला शिवीगाळ केली
या घटनेमुळे नवरा बायकोत वाद होऊ लागले. पतीसोबत वाद होत असल्याने 19 वर्षीय विवाहिता अखेर तिच्या माहेरी आली. ही संधी साधत 30 डिसेंबर 2022 ला मेहुणीला आधार कार्ड दुरुस्त करून देण्याचा बहाणा करत बलराम शिंगने हा रोहणवाडी येथे घेऊन गेला. त्यानंतर मेहुणा बलराम याने विवाहित मेहुणीवर रोहणवाडी येथे एका मित्राच्या घरी नेऊन शारीरिक अत्याचार केला. त्यानंतरही त्यानं अनेकदा मेहुणीवर अत्याचार केल्याची माहिती आता उघड झालीय.