
दैनिक चालु वार्ता जालना प्रतिनिधी -आकाश माने
परतूर विधानसभा मतदारसंघातील 90 टक्के ग्रामपंचायती व सोसायटी, भाजपाच्या ताब्यात असल्याने आष्टी परतुर व मंठा या तिन्ही कृषी उत्पन्न बाजार समिती मधील भारतीय जनता पक्षाचे पॅनल प्रचंड मतांनी विजयी होईल – आमदार बबनराव लोणीकर
=============================
दिनांक -20/04/2023
मंठा परतूर आष्टी येथे शेती माल हमी भाव खरेदी केंद्र चालू केले त्यामुळे प्रति कुंटल 1000 रुपये शेतकरी बांधवाना जास्त मिळाले असून. शेतकऱ्यांना पूर्वी केंद्र सरकार कडून वर्षाला सहा हजार रुपये सन्मान निधी मिळत होता त्यात आता भर पडली असून राज्य सरकार ही आता वर्षाला सहा हजार रुपये शेतकऱ्यांना सन्मान निधी मिळणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी वचनबद्ध आहे. माझ्याकडे पाणीपुरवठा व स्वच्छता खात्याचा मंत्रीपदाचा कारभार असतांना आपण मतदार संघात मराठवाडा वॉटर ग्रीड योजना यशस्वीपणे राबवून रस्त्याचे जाळ निर्माण करू शकलो, विजेचे जाळ निर्माण करू शकलो. आता ही मंठा परतूर आणी आष्टी कृषी उत्पन्न बाजार समिती चा सर्वांगीण विकास करायचा असल्याने व आपण सरकार मध्ये असल्याने बाजार समितीच्या विकासाकरिता आपण सरकारकडून भरमसाठ निधी मंजूर करून आणून कृषी उत्पन्न बाजार समित्या सक्षम करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सुविधा पुरविण्याचा आपला मानस आहे. असे प्रतिपादन मराठवाडा वॉटर ग्रीड योजने चे जनक, लोकप्रिय लोकनेते, माजी मंत्री तथा परतूर विधानसभा मतदार संघांचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी केले.
आज दिनांक 19 एप्रिल 2023 वार बुधवार रोजी मंठा कृषी उत्पन्न बाजार समिती च्या निवडणुकी संदर्भात मंठा येथील सरस्वती मंगल कार्यालयात भारतीय जनता पार्टी तालुका मंठा येथे चर्चासत्र व मतदारांच्या भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी ते बोलत होते.
या वेळी व्यासपिठावर माजी कृषी उत्पन्न बाजार समिती चे माजी सभापती संदीपभैय्या गोरे, भारतीय जनता पक्षाचे मंठा तालुका अध्यक्ष सतीशराव निर्वळ, पंजाबराव बोराडे, गणेशराव खवणे, नागेशजी घारे, अंकूश आबा बोराडे, उद्धवबापू गोंडगे, प्राध्यापक गडदे सर, विठ्ठलराव काळे, संभाजीराव खंदारे, राजेशजी मोरे, सुभाषराव घारे, प्रल्हादराव बोराडे, माऊली गोंडगे, मुस्तफा पठाण, विलास घोडके, पवन केंधले, लक्षमन बोराडे, एन डी दवणे यांची उपस्थिती होती. या वेळी आमदार लोणीकर यांनी पुढे बोलताना विरोधकांनाचा खरपूस समाचार घेतला पुढे बोलताना मंठा कृषी उत्पन्न बाजार समिती ची काही जागा विकल्याचा खोटा प्रचार विरोधक करत असून कुठलीही जागा मागील कृषी उत्पन्न बाजार समिती च्या संचालक मंडळींनी विकली नसून भाड्याने दिली आहे माझ्या परतूर विधानसभा मतदार संघात महाभकास आघाडी च्या कोणत्याही नेत्याने किंवा कोणत्याही कार्यकर्त्याने विकासासाठी 1रुपया कधी आणला नाही त्यामुळे त्यांना विकासाच्या गप्पा मारून मतदारांना आणी सर्व सामान्य जनतेला खोट बोलून फसवीण्याचा कुठलाही अधिकार नाही.
परतूर विधानसभा मतदारसंघात 90% सोसायटी व ग्रामपंचायत या भाजपाच्या ताब्यात असल्याने
आष्टी परतूर आणि मंठा या तिन्ही कृषी उत्पन्न बाजार समिती च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे सर्वच्या सर्व उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी होणार आहेत. असा दावाही आमदार लोणीकर यांनी यावेळी केला. खोट नाट बोलत आमच्या मतदारांना किंवा उमेदवाराना धमकावाल तर याद राखून राहावा तुमची गाठ माझ्याशी आहे. तुम्ही केलेल्या भ्रष्टाचारच पितळ जनते समोर उघड पाडील अशे वक्तव्य देखील आमदार लोणीकर यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजपा तालुका अध्यक्ष सतीशराव निर्वळ यांनी केले तर संदीपभैय्या गोरे यांनी उपस्थिती हजारो कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत पॅनलच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आव्हान उपस्थितांना केले. या वेळी मंठा तालुक्यातील हजारो भाजपा कार्यकर्ते, सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य, चेअरमन, व्हॉइस चेअरमन सोसायटी चे सदस्य उपस्थित होते.