
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
लोहा शहरातील बीडवई नगर येथील श्री स्वामी समर्थ सांस्कृतिक सभामंडप बांधकामासाठी लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सावकार सूर्यवंशी यांनी 24 लक्ष 55 हजार रुपयांची तरतूद करून निधी उपलब्ध करून दिला श्री स्वामी समर्थ यांच्या पुण्यतिथीनिमित्त अखंड नाम जप सोहळा सामूहिक गुरुचरित्र पारायण सोहळ्या चे औचित्य साधून नगराध्यक्ष गजानन सावकार सूर्यवंशी यांच्या हस्ते या सांस्कृतिक सभामंडपा च्या बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला
यावेळी माजी नगराध्यक्ष किरण सावकार वटमवार लक्ष्मीकांत सूर्यवंशी हरीशेट आंबेकर बालाजी इर्मलवार मुकुंद गुरू पपु रहाटकर संजय चव्हाण बालाजी पाटील आईनवाडीकर आदी मान्यवर उपस्थित होते
बिडवई नगर येथे नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी यांच्या पुढाकारातून जनतेच्या सेवेत 25 लक्ष रुपयांचा भव्य श्री समर्थ स्वामी मंदिर सभामंडप बांधकाम होत असल्याने या समस्त स्वामी समर्थ सेवेकरी भक्तांनी नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी यांचे जाहीर आभार व्यक्त केले व समस्त स्वामी समर्थ सेवेकरी भक्तांनी लोहा नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगरअध्यक्ष गजानन सावकार सुर्यवंशी यांचा भव्य सत्कार केला