
दैनिक चालु वार्ता मुखेड प्रतिनिधी-शिवकुमार बिरादार
मुखेड पासून अगदी जवळ असलेल्या खरबखंडगाव केंद्रातील जि. प.प्रा. शाळा चिवळी या शाळेला नुकताच आंतरराष्ट्रीय गुणांकन प्रमाणपत्र(ISO)मानांकन प्राप्त झाले.ही शाळा इयत्ता1 ली ते 4 था इयते ची असून या शाळेत 67 विध्यार्थी संख्या असून , ही शाळा दोन शिक्षकी आहे.या शाळेचे मुख्याध्यापक श्री.सय्यद अली सर हे 17 जून 2019 पासून या शाळेत कार्यरत आहेत त्यांच्या सोबत सौ वर्षा धोंडीराम पाटील या सहशिक्षिका आहेत.या जोडगोळीने चिवळी शाळेचा गेल्या चार वर्षात अथक परिश्रमातून शाळेचा काया पालट केला.शाळेत वृक्षारोपण, लोकवर्गणीतून सम्पूर्ण शाळा डिजिटल, ग्रामपंचायत मार्फत,15 व्या वित्तआयोगातून सर्व वर्गात पॉलिश फरशी केली, सर्व वर्ग खोलीत led टीव्ही, संगणक कक्ष, मुलांना फॅन ची सुविधा, प्रिंटर, सर्व वर्ग खोली डिजिटल बोलक्या भिंती,पिण्याच्या पाण्याची सोय, मुलांना हाथ धुण्यासाठी हँडवास स्टेशन, मुलामुलींसाठी स्वच्छता गृह या भौतिक सुविधे सह गुणवत्ता वाढविण्यासाठी अनेक सहशालेय उपक्रम राबविण्यात येऊन शाळा ही झाडे वेलीच्या सौंदर्यात खुलून दिसते.इयत्ता 1ली पासून सर्व मुले इंग्रजी वाचन,लेखन करतात, शाळेची गुणवत्ता, मुलांचे आकर्षित शाळेचे नाव असलेले गणवेश,मुलांच्या गळ्यात शाळेच्या नावाचे ओळखपत्र, असे अनेक उपक्रम राबवून शाळा ही केंद्रातील उपक्रम शील शाळा म्हणून नावारूपाला आणण्यासाठी दोन्ही शिक्षक यांनी आर्थिक व बौधिक मेहनत घेऊन विविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम राबवून ही शाळा तालुक्यातील दोन शिक्षकी शाळा ISO मानांकन प्राप्त करणारी पहिली शाळा ठरली. आपल्या तालुक्याचे आमदार तुषार राठोड ,तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी कैलास होनधरने,शिक्षण विस्तार अधिकारी विठ्ठलराव वडजे ,केंद्रप्रमुख गजानन पवितवार शाळेचे शा. व्य. समिती अध्यक्ष संदीप पाटील उपस्थित होते.त्यांच्या या यशाचे सर्व स्तरातून,गावकऱ्यांकडून कौतुक होत आहे.