
दैनिक चालू वार्ता नांदेड उत्तर प्रतिनिधी- समर्थ दादाराव लोखंडे
_________________________________________
नांदेड : मराठवाडा शिक्षक संघाचे विभागीय अध्यक्ष श्री सुर्यकांत संग्राम विश्वासराव यांच्या नेतृत्वाखाली लातूर विभागातील नांदेड, लातूर व धाराशिव जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील विविध प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी शिक्षण उपसंचालक साहेब, लातूर यांच्या समवेत दिनांक:27/04/2023 गुरूवार रोजी ठिक 11 वाजता तक्रार निवारण बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत मराठवाडा शिक्षक संघाचे लातूर विभागातील तीनही जिल्ह्यातील पदाधिकारी, केंद्र कार्यकारिणी पदाधिकारी उपस्थित राहून आपापल्या जिल्ह्यातील प्रलंबित शैक्षणिक प्रश्न सोडवून घेणार आहेत. तरी नांदेड जिल्यातील प्राध्यापक , शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी बांधवांचे मा.शिक्षण उपसंचालक कार्यालय लातूर यांच्याशी संबंधित प्रश्न असतील तर त्यांनी आपले प्रश्न दि.26/4/2023पर्यंत मराठवाडा शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष ,सचिव व इतर पदाधिकारी यांच्या कडे लेखी स्वरूपात द्यावेत अथवा समक्ष लातूर येथे उपस्थित रहावे.
अशी माहिती मराठवाडा शिक्षकसंघाचे जिल्हाध्यक्ष, श्री व्यंकटराव चिलवरवार सचिव श्री रविद्र वाकोडे यांनी दिली आहे.