
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड- गोविंद पवार
लोहा : – सध्या मुस्लीम धर्मीयांचा पवित्र रमजान महिना सुरु आहे. हिंदू – मुस्लीम एकतेचे प्रतीक असलेल्या या महिन्याच्या उत्सवात दररोज मुस्लीम बांधव इफ्तार पार्टीचे आयोजन करत असतात.
हिंदू मुस्लिम सर्व समाजात एकोपा रहावा याच अनुषंगाने पेनुर येथील बाळासाहेबांची शिवसेना उपजिल्हाप्रमुख युवा नेते मारोती ऐजगे तसेच त्यांच्या सोबत नेहमी सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असणारे युवा उद्योजक तथा विमा प्रतिनिधी रावसाहेब पा गवते यांनी पेनुर येथील मुस्लिम बांधवांना इप्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते .
हिंदू – मुस्लिम एकता टिकुन राहावी भक्तिभाव , एकात्मता, शांतता , बंधूभाव , कायम राहवा यासाठी या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते . या कार्यक्रमा दरम्यान शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख मारोती ऐजगे विमा प्रतिनिधी रावसाहेब गवते सह अन्य मान्यवराचा मुस्लिम बांधवाच्या वतीने भव्य दिव्य सत्कार करण्यात आला.