
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
अखेर नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांच्या पाठपुराव्याला यश आले असून लोहा येथील लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीच्या संरक्षण भिंत व रस्त्याच्या विकास कामासाठी जिल्हाधिकाऱ्यांने दिली ६७लाख ३७हजार ३७२ रुपयाच्या निधीला प्रशासकिय मान्यता.
लोहा येथील बहुचर्चित लिंगायत समाज बांधवांसाठी लोहा न.पा.चे कर्तव्यदक्ष लोकप्रिय लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांनी जुना लोहा येथे अगोदर जागा उपलब्ध करून दिली व आता या स्मशानभूमीच्या विकासासाठी नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांनी सतत जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांच्याकडे पाठपुरावा केला तेव्हा जिल्हाधिकारी नांदेड यांनी यांची दाखल घेऊन दि. २९-३-२९२३ रोजी प्रशासकिय मान्यतेचे आदेश काढून नगर परिषद लोहा यांना महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोतथान महाअभियान (जिल्हा स्तर) योजना २०२२-२३ अंतर्गत लोहा नगर परिषद हदीतील गट क्रमांक ३८८ मधिल लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीला संरक्षण भिंत बांधकाम करणे यासाठी ६७२७३७ मंजूर केला असुन यात ६०५४६३६ रुपये शासन अनुदानाची रक्कम व लोहा न.पा.ने भरायची६७२७३७ असुन अशी एकुण ६७२७३७३ रुपये निधीस नांदेड जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी मान्यता दिली आहे.
त्यामुळे लोहा येथील लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीच्या विकास कामांसाठी गती मिळाली आहे अशी माहिती नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांनी दिली.या वेळी लोहा शहरातील समस्त वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने लोहा नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगरअध्यक्ष गजानन सावकार सुर्यवंशी यांचा भव्य सत्कार करण्यात आला