
दैनिक चालु वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
लातूर/अहमदपूर:- ढाळेगाव ता.अहमदपूर जि. लातूर येथे स्टार्स प्रकल्प अंतर्गतशालेय शिक्षण व क्रीडा विभाग
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र पुणे स्वयंसेवी संस्था प्रथम,जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था मुरूड डायट द्वारा आयोजित शाळापुर्व तयारी अभियान केन्द्र स्तरीय प्रशिक्षण ढाळेगाव केन्द्रातील वर्ग ०१ ते ०५ शिकवणारे सर्व शिक्षक, मुख्याध्यापक तसेच कार्यक्षेत्रातील कार्यरत सर्व अंगणवाडी च्या अंगणवाडी कार्यकर्ता यांचे एक दिवसीय प्रशिक्षण जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, ढाळेगाव येथे दिनांक २०/०४/२०२३ यशस्वी रीत्या संपन्न झाले.
प्रशिक्षणासाठी मार्गदर्शक म्हणुन
शिक्षण विस्तार अधिकारी, खंडाळी बीट तथा केंद्र प्रमुख ढाळेगाव चे श्री शिंदे बी.एन. मुख्याध्यापक जि.प. के. प्रा. शा. ढाळेगाव श्री शंकरराव कदम सर
तसेच मुख्याध्यापक जि.प. प्रा. शा. मावलगाव श्री सुजितराव गायकवाड, जि प प्रा. शा धसवाडी श्री अण्णाराव गोणे, सर्व घटक शाळांचे मुख्याध्यापक, सहशिक्षक/शिक्षिका, तसेच अंगणवाडी ताई
हे उपस्थित होते.
निरीक्षक:- श्रीमती सुरवसे मॅडम विषय तज्ञ गट साधन केंद्र अहमदपूर
सुलभक:-1) श्री चोले एल. पी 2) श्रीमती गुरमे एस.एम
सर्वप्रथम गावात दवंडी देण्यात आली, त्यानंतर गावातून प्रभातफेरी काढण्यात आली….. सर्व प्रवेशपात्र विद्यार्थी व पालकांना शाळेत बोलावून प्रत्यक्ष (DEMO)
यावेळी 7 टेबलावर 14 जणांची निवड करून प्रवेश प्रक्रिया कशा प्रकारे राबवावी याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले.
टेबल क्रं 1 . 1)श्रीमती गुदळे मँडम 2)श्रीमती वाघमारे मँडम
टेबल क्रं 2 .1)श्री केंद्रे व्ही. बी 2)श्री मुंढे आर डी
टेबल क्रं 3 . 1) नागरगोजे एच व्ही 2)श्री गोणे ए आर
टेबल क्रं 4. 1) श्री वाघमारे एम बी 2)श्री सोणेराव पवार सर
टेबल क्रं 5 .1) श्रीमती उगिले ए डी 2) श्री.सूर्यवंशी के एन
टेबल क्रं 6. 1) श्री. कांबळे एस एस 2) श्री नकाते सी बी
टेबल क्र7. 1)श्री इरले एस.जी 2) श्री गोरगे एस एम
या सर्व शिक्षक बांधवांनी प्रवेश प्रक्रियेचा Demo तयार करून प्रत्यक्षात प्रवेश प्रक्रिया कशी राबवता येईल हे सांगितले.
वरील प्रमाणे अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये शाळा पूर्वतयारी केंद्रस्तरीय मेळावा संपन्न झाला.
श्रीमती सुरवसे मॅडम यांनी स्तरनिहाय अध्ययन निश्चिती सर्वेक्षण बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
शेवटी श्रीमती गुरमे एस एम यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले व कार्यक्रम संपन्न झाला.