
दैनिक चालु वार्ता ग्रामीण प्रतिनिधी -माणिक सुर्यवंशी.
……………………..
श्री शिवशंकर माध्यमिक विद्यालय वन्नाळी ता. देगलूर येथील कलाध्यापक,प्रख्यात ग्रामीण कवी,कथाकार तथा चित्रकार बालाजी पेटेकर खतगावकर यांनी देगलुर येथे शिवजयंती निमित्त घेण्यात आलेल्या खुल्या तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेत आपल्या कलात्मकतेनी तालुक्यातून द्वितीय येण्याचा मान मिळवला.तर त्यांची विद्यार्थ्यांनी कु.ऋतुजा वाघमारे ही शालेय गटातुन तालुक्यातून प्रथम येत आपल्या गुरुपेक्षाही एक पाऊल पुढे टाकत यश संपादन केले.याविषयी कलाध्यापक पेटेकर सर म्हणाले की,जगात अश्या दोघांना वाटतं की आपला पाल्य आपला विद्यार्थ्यी आपल्या पेक्षाही कर्तृत्ववान व्हावं.ते म्हणजे एक गुरु आणि आई-वडील….
आपली विद्यार्थ्यीनी ७३३ विद्यार्थ्यां मधुन प्रथम येऊन ५०००/चे पारीतोषिक मिळवते अशा दैदिप्यमान यशापेक्षा एका शिक्षकांना अजून काय हवं… आपल्या यशापेक्षा विद्यार्थ्यांच्या यशस्वीतेत मिळणारा आनंद शब्दांच्या पलिकडे असतो.प्रत्येक गुणवंत विद्यार्थ्यांच्या शाळेत जाऊन त्यांच्या वर्गमित्रासमोर त़्यांचा सत्कार करण्याची प्रेरणा देण्याची ही अफलातून संकल्पना
युवानेते अनिकेत पाटील राजुरकर, डॉ. सुनील जाधव,दिगंबर कौरवार व मित्रमंडळाची होती. त्यांच्या हस्ते त्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. ऋतुजा वाघमारे, ह्या विद्यार्थिनींचा तालुकास्तरीय स्पर्धेतील यशस्वीते बद्दल त्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.शाळेचे मुख्याध्यापक, सुरेश वनंजे यांनी जयंती मंडळाच्या कार्यकर्त्यांचे स्वागत केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल वाघमारे सर यांनी केले. आभार बालाजी बारडवार सर यानी मानले.यावेळी राजेश बामणे,धनाजी पा.मोरे, आनंद दिमलवाड,माधव कदम,दिगंबर खिसे, सौ.अंजली देशमुख, दिलीप पाटील अंकमवार मामा आदींनी त्यांचे अभिनंदन केले.