
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -अवधूत शेंद्रे
आष्टी(श)(वर्धा)प्रतिनिधी:तालुक्यातील टेकोडा(भारसवाडा)येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त प्रबोधन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते त्यात दि.१४ एप्रिल रोजी श्रीरत्न बुद्ध विहार टेकडा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विविध प्रकारचे कार्यक्रम घेण्यात आले त्यामध्ये सकाळी ७ वाजता आयु. माधवराव सोनटक्के यांचे असते पंचशील ध्वजारोहण करण्यात आले सकाळी ७:३० वाजता आयु. चंद्रभानजी पखाले यांच्या हस्ते ध्वज वंदना घेण्यात आली ८ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर तथागत भगवान गौतम बुद्ध क्रांतीबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन उद्धवराव कठाने यांच्या हस्ते घेण्यात आले ८:३० वाजता परित्राण पठण व धम्मदेशना आयु. मधुकरराव गडलिंग यांच्या हस्ते घेण्यात आले यानंतर सकाळी ११ वाजता प्रबोधन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते व्याख्यानमालेचे अध्यक्ष म्हणून आयु जयाताई प्र कठाणे उपस्थित होत्या तर प्रमुख वक्त्या म्हणून प्रतीक्षाताई दापूरकर उपस्थित होत्या विशेष उपस्थिती म्हणून आयु. अतुल डोळस आयु.चंद्रशेखर चतुर आयु. नितेश डोळस आयु. राहुल गजरे उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे संचालन मनीष काळबांडे यांनी केले तर आभार शितल वानखडे यांनी मानले जयंती दिनाचा समारोप गावातील प्रमुख मार्गाने भव्य दिव्य समता रॅली काढण्यात आली यासाठी गावातील सर्व नागरिकांनी सहकार्याची भूमिका बजावली.