
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी – स्वरूप गिरमकर
वाघोली ता 20 शिरूर तालुका मित्र परिवाराचे संस्थापक अध्यक्ष श्री बाळा भाऊ पऱ्हाड यांना ते करीत असलेल्या सामाजिक कार्यासाठी बालगंधर्व रंगमंदिर येथे सामाजिक कार्यासाठी कृतज्ञता सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले…
रांका ज्वेलर्स व लिज्जत पापड समूह यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यातआला. रांका ज्वेलर्स समूहाचे अध्यक्ष फत्तेचंदजी रांका,
लिज्जत पापड समुहाचे श्री सुरेश कोते साहेब यांच्या हस्ते हा पुरस्कार मोठ्या दिमाखात प्रदान करण्यात आला.
समाज कार्य करण्याची बाळा भाऊंची तळमळ आणि त्यांनी आता पर्यंत केलेल्या कामाची पावती त्यांना खऱ्या अर्थाने मिळाली असे प्रतिपादन त्यांचे अभिनंदन करताना आदर्श सरपंच सुनिलदादा सात्रस यांनी केले व पुढील वाटचालीसाठी मित्र परिवाराच्या वतीने शुभेच्छा दिल्या.
बाळाभाऊनी प्रतिक्रिया देताना रांका ज्वेलर्स व लिज्जत पापड समूह यांचे मनापासून आभार मानून सर्वसामान्य लोकांच्या मदतीसाठी तत्पर राहणार असल्याचे सांगितले.
.