
दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
नांदेड-कंधार :- कौठा येथे प्रतीवर्षी प्रमाणे याही वर्षी दिनांक २२एप्रिल रोजी क्रांतीसुर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज सार्वजनिक जयंती मंडळांच्या वतीने सर्व रोग निदान शिबिर मोटरसायकल रॅली व्याख्यान व सायंकाळी मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले आहे
कंधार तालुक्यातील कौठा येथे क्रांती सुर्य जगंत ज्योती महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त दि २२ एप्रिल रोजी सकाळी १० वा महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व आरोग्य तपासणी शिबिर शुभारंभ डॉ विरूपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेडकर यांच्या हस्ते होणार आहे यावेळी सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे सायंकाळी ४ वा व्याख्याता बसवराज पाटील यांचे महात्मा बसवेश्वर यांच्या जिवनावर व्याख्यानं सायंकाळी गावच्या मुख्य रस्त्याने भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे तरी परिसरातील नागरिकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन जयंती मंडळांच्या वतीने करण्यात आले आहे