
दैनिक चालू वार्ता भुम प्रतिनिधी-
भू म:-शिवजलक्रांतीचे प्रनेते राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री धाराशिव प्रा. डॉ तानाजीराव सावंत यांच्या स्वखर्चातून विकासरत्न ना.प्रा.डाॅ.तानाजीराव सावंत प्रतिष्ठाण यांच्या माध्यमातून वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे शिवजलक्रांती टप्पा -४ आरसोली येथे मंत्रीमहोदय ना.प्रा.डाॅ.तानाजीराव सावंत व ना.प्रा. डॉ तानाजीराव सावंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामचंद्र घोगरे यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर व अँड सत्यवान गपाट यांच्या प्रमुख उपस्थितीत नदी खोलीकरण व सरळीकरण चे काम गावातील बांधावरील शेतकरी ज्ञानेश्वर चंदनशिव, पवन मुंडेकर ,सुदाम नागटिळक , वसंत मुंडेकर, यांच्या हस्ते शुभ हस्ते श्रिफळ फोडून करण्यात आले.
शिवजल क्रांतीच्या कामामुळे विश्वरूपा नदीचे रुंदीकरण व खोलीकरण होत असल्याने विहिरीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होणार असल्याने शेतकऱ्यांना हक्काची पिके घेता येणार आहे. याच बरोबर शेकडो हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे.
यावेळी अमोल खराडे , दिपक नागटिळक, रोहित चंदनशिवे, उल्हास सातपुते,दशरथ मोरे,अर्जुन काळे, बापूराव पाटुळे, दिपक मुंडकर, पंडित पोतदार , नवनाथ गोयकर,तानाजी खराडे, शेषेराव खंदारे, बालाजी खराडे,विशाल पाटुळे, दत्ता चंदनशिव, प्रशांत चंदनशिव ,गणेश चंदनशिवे, आकाश सोनवणे,महादेव थेटे, सुहास गायकवाड ,विजय तेलंग व गावातील शेतकरी उपस्थित होते.