दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे.
मंठा
तालुक्यातील १५ व्या वित्त आयोग योजना अंतर्गत पाणी पुरवठा कामाची गाव निहाय व काम निहाय चौकशी व स्थळ पंचनामा करुन दोषी विरुध्द कडक कारवाई करण्याची मागणी केली होती; अद्याप पर्यंत कडक कार्यवाही न झाल्यामुळे आमरण उपोषणास बसण्याचा इशारा अशोकराव वायाळ व गजानन माळकर यांनी गटविकास अधिकारी यांना दिलेल्या नियोजनात म्हटले आहे. (ता.१३) रोजी दिलेला अर्ज. की, सन २०२० ते २०२३ या कालावधीत १५ व्या वित्त आयोग अंतर्गत पाणी पुरवठा चे कामे बहुतांश ग्रा.पं. ला कृती आरखडया मध्ये समाविष्ट होती परंतू सदरील ग्रा.पं.ने प्रत्यक्ष कामे न करता बनावट मोजमाप पुस्तीका तयार करुन तर काही ठिकाणी थातुर मातुर कामे करुन लाखो रुपयांची बिले उचलून लाखो रुपयांचा अपहार केलेला आहे.
निवेदनात पुढे असे म्हटले आहे की यामध्ये संबधीत पाणी पुरवठा अभियंता श्री.हिस्वनकर गटविकास अधिकारी श्री.थोरात व संबंधित सर्व ग्राम पंचायतीचे ग्रामसेवक मंठा पंचायत समितीचे संबंधित विस्तार अधिकारी श्री.पाटील व श्री.तायडे यांचा मोठा सहभाग दिसून येत आहे कारण सदरील अभियंता यांनी चक्क बनावट एम. बी. तयार करुन शासनाची दिशाभुल तर केलीच आहे गावातील नागरीकांना पाण्या पासून वंचित ठेवले आहे.
१५ वा वित्त आयोगाचे कृती आरखाडे पाहता शासनाकडून प्रत्येक कामास , प्रत्येक घटकास बजेट दिले आहे त्यानुसार कामे करणे अनिवार्य असतांना देखील पाणी पुरवठा अभियंता यांनी शासनाचे सर्व नियम डावलून कामे केली आहे त्यामध्ये त्यांच्यासह त्या यंत्रणेतील लोकांची खिशे गरम झाली मात्र नागरीकांना योजना केवळ कागदोपत्री पाहावयास मिळत आहेत.अनेक वेळा माहिती अधिकारात माहिती मागितली असता कुणीही माहिती देत नाही या वरुन असे दिसते की यात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे.वेळोवेळी गटविकास अधिकाऱ्यांना विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात येतात.पंचायत समिती मध्ये कोणताही अधिकारी व कर्मचारी उपस्थित नसतो कुठे तरी धाब्यावर बसुन रात्रीचाच खेळ चाले असे कामकाज सुरू आहे.
या बाबत प्रत्येक गावातील ज्या त्या वर्षीच्या कृती आराखया प्रमाणे पाणी पुरवठा कामाची प्रत्यक्ष स्थळ पाहणी अर्जदारासमक्ष करण्यात यावी व सदरील केलेल्या चौकशी अहवालानुसार दोषी विरूध्द कडक कार्यवाही करण्यात नसता आपल्या कार्यालया समोर येत्या २१एप्रिल रोजी अर्धनग्न आमरण उपोषण करण्यात येईल याची नोंद घ्यावी या बाबत तक्रारदार यांनी आपणसा उक्त संदर्भान्वये अर्ज दिला होता परंतू आपण सदरील अर्जाची कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही आणि सदरील कामात भ्रष्टाचार करणाऱ्यांना पाठीशी घालत आहात.
यावरुन असे सिध्द होते की, सदरील लाखो रुपयांच्या भ्रष्टाचारात आपला देखील हिस्सेदार आहात . सदरील लोकांमुळे शासनाचे उदिष्ट साध्य होत नाही केवळ कागदोपत्री रेकॉर्ड तयार करुन त्या आधारे बिले उचलून घेण्यात आलेली आहेत या बाबत उचित कार्यवाही होणे आवश्यक आहे.
करिता आपणास विनंती की, सदरील विषयी आपण अद्याप पर्यत कोणत्याही प्रकारची कार्यवाही न केल्यामुळे दिनांक.२१/४/२०२३ रोजी पासून आपल्या कार्यालया समोर आमरण उपोषण कराण्यात येईल याची नोंद घ्यावी. या निवेदनावर अशोक वायाळ, गजानन माळकर यांच्या स्वाक्षरी आहे
