दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे
मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य.जिल्हाधिकारी यांच्या मार्फत दिनांक.१९ एप्रिल २०२३ रोजी निवेदन देऊन निवेदनात म्हटले आहे कि जालना जिल्ह्यात, अन्न व भेसळ विभागाच्या अधिकाऱ्यांना पूर्ण माहिती असून सुद्धा भेसळ बनावट मिक्स तंबाखू सुपारी वेगवेगळ्या पुड्या निर्माण करून विक्री केली जातात,या भेसळयुक्त पुड्या जालना जिल्ह्यासह परतूर मंठा तालुक्यात अनेक किराणा दुकानदार मिक्स गुटखा पुड्या व किराणा दुकानदाराला पुरवठा करणारे टोळी जालना जिल्ह्यात सक्रिय असून अधिकृत परवानाधारक किराणा दुकानदार यांना माहिती असून सुद्धा मोठमोठ्या कंपन्यांच्या नावाखाली बोगस केमिकल बोगस सुपारी बोगस साहित्य मिश्रित करून तंबाखू व सुपारीच्या पुड्या निर्माण केल्या जातात हे देशद्रोही कृत्य करणाऱ्या गुटखा माफिया यांना डुप्लिकेट पुड्या विक्री करून सहकार्य केल्यामुळे किराणा दुकानदार यांची चौकशी करून कठोर कारवाई करण्या यावी,कारण बनावट पुड्या बनवण्याचे साहित्य सहज उपलब्ध होत असल्यामुळे भेसळ बनावट सुपारी व तंबाखू गुटखा पुड्या निर्माण करून स्वस्त भावात किराणा दुकान मालकाला पुरवठा करणारी टोळी अनेक दिवसापासून जालना जिल्ह्यात सक्रिय आहे, या गंभीर विषयाची संपूर्ण माहिती जालना जिल्ह्याच्या संबंधित भेसळ विक्री अधिकाऱ्याला पूर्वकल्पना आहे,परंतु काही प्रेमाचे आर्थिक हितसंबंध असल्यामुळे आयुक्त संबंधित अधिकारी संबंधित थातूरमातूर कारवाई करून सोडून देतात, परंतु भेसळ वित्त पुड्या निर्माण करणरी टोळीने देशद्रोही कृत्य करत आहे,म्हणून मोका कायद्याअंतर्गत कारवाई झालीच पाहिजे कारण, भेसळयुक्त बनावट अवैध सुपारी व तंबाखूच्या पुड्या बनवणारे टोळी व किराणा दुकान मालक यांच्याकडून बोगस पुड्या खरेदी करून लोकांना विक्री केल्या जातात, बोगस सुपारी तंबाखूच्या पुढे बनवणारे कारखाने घरगुती कारखाने अज्ञास्थळी भेसळयुक्त पुड्या निर्मिती करतात, हे भेसळयुक्त पुड्या निर्माण करण्यासाठी अनेक शहरांमध्ये प्रत्येक ब्रँडेड नामावंत सुपारी व तंबाखूच्या पुड्याचे कव्हर उपलब्ध असल्यामुळे या बोगस पुढे तयार करून विक्री केल्या जात आहेत, हे बोगस सुपारी तंबाखूच्या पुड्या निर्माण करणाऱ्या टोळी ला व काही दुकानदारांना ताब्यात घेऊन पोलिसांमार्फत कसून चौकशी केल्यास हे पूर्ण षडयंत्र मास्टर माईंड लोक समोर येतील, कारण भेसळ सुपारीच्या व तंबाखूच्या पुड्या निर्माण करून देणाऱ्या बोगस घरगुती कारखाने आहेत, या भेसळयुक्त पुड्या होपलेस केमिकल चुना कात मिश्रित करून कोणती ही मात्रा प्रमाण नसल्यामुळे अनेक लोकांच्या तोंडातले येत आहे हे अत्यंत घातक आहे, म्हणून भेसळ विक्त सुपारी पुड्या व तंबाखू पुड्या निर्माण करून अनेक मावंत कंपन्याच्या सुपारीच्या व तंबाखूच्या पुण्यामध्ये मध्ये सुपारी व तंबाखू भरून वेगवेगळ्या त्या पुड्या पुरवठा दुकानदारांना मालक यांना विकल्या जातात, खराब सुपारी खराब चुना खराब का निकृष्ट दर्जाचे केमिकल मिश्रित करून पुढे तयार करून पुरवठा केली जातो,हे केमिकल घातक केमिकल असल्यामुळे येणाऱ्या काही वर्षात या तरुण पिढीला कॅन्सर सारखा गंभीर आजार होण्याचा धोका आहे ? म्हणून राष्ट्रीय हित लक्षात घेऊन निडर अधिकाऱ्यांची टीम पैशाला न बळी पडणारे अधिकारी यांचे पथक नेमून करून जालना जिल्ह्यातील प्रत्येक किराणा दुकानाची तपासणी करून त्या काही भेसळयुक्त पुड्या जप्त करून परीक्षण करण्यासाठी पाठवून लॅबच्या रिपोर्टनुसार बनावट पुड्या निर्माण करणाऱ्या सक्रिय टोळीला ताब्यात घेऊन राष्ट्रीय सुरक्षा कायदा अंतर्गत, या टोळीला पुड्या विक्री करून सहकार्य करणाऱ्या किराणा दुकानदारावर मालक,अन्न व भेसळ अधिकारी यांच्या वर कठोर कारवाई करण्यात यावी,
योग्य ती कारवाई न झाल्यास डुप्लिकेट पुड्या खाऊन उध्वस्त झालेल्या कुटुंबाला सोबत घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपविभागीय अधिकारी परतुर यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करील याची नोंद घ्यावी. सेवटी निवेदनाद्वारे इशारा देण्यात आला…
