
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
लोहा, तालुक्यातील पांगरी बोरगाव रस्त्यावरील गट क्रमांक :- 191 मधे महावितरणचे विद्युत पोल पुर्णपणे झुकल्याने बोरगाव रस्त्यावरील प्रवाश्यांना व शेतकऱ्यांना प्रचंड हाल सोसावे लागत आहेत कारेगाव सप्टेशन वरुन येणारी खडक मांजरी फिटरवर विद्युत प्रवाह चालु आहे विद्युत पोल पुर्णपणे झुकले असुन तारा जमिनी पर्यंत आलेल्या दिसत आहेत त्याकडे महावितरणचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते तरी मोठा अपघात होऊ शकतो याकडे महावितरणचे अधिकारी यांनी जातीने लक्ष देवून पुढिल अनर्थ टाळावा अशी मागणी पांगरी येथील गावकरी /शेतकरी व बोरगाव रस्त्याने जाणारे प्रवासी करीत आहेत महावितरण च्या गलथान कारभारामुळे पुढील मनुष्यहानी अथवा जनावरांची हानी होऊ नये यासाठी महावितरण अधिकारी यांनी तात्काळ लक्ष देवून पुढील संकट टाळावे प्रवासी व शेतकरी व जनावरे यांना काही धोका उद्भवल्यास त्यास सर्वस्वी महावितरण जबाबदार राहील