
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे
मंठा तालुक्यातील तळतोंडी येथील उद्धव ज्ञानदेव वरकड याने दारू पिऊन जातीवाचक शिवीगाळ करून हातपाय तोडण्याची धमकी दिल्याप्रकरणी मंठा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी राजेश सीताराम लहाने याने तक्रार दिली की, मी माझी आई – वडील, पत्नी भावासह आम्ही एकत्र कुटुंबात राहतो. माझी आई इंदुबाई लहान माजी सरपंच असून समाजसेविका आहे तसेच आमचे गावात छोटेसे किराणा दुकान असून ते मी चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो(ता१७) एप्रिल रोजी रात्री सात वाजेच्या सुमारास मी आमच्या किराणा दुकानावर असताना आमच्या गावातील उद्धव ज्ञानदेव वरकड हा दारू पिऊन माझ्या किराणा दुकानासमोर सार्वजनिक रोडवर आला व मला उधार सिगारेट मागू लागला, तेव्हा मी त्यास म्हणालो की, तू आमची मागची उधारी जमा कर तेव्हा तुला उधार देतो. त्यावरून उद्धव वरकड याने मला जातीवाचक शिवीगाळ केली. शिवीगाळीचा आवाज ऐकून माझी आई इंदुबाई लहाने दुकानावर आली असता माझ्या आईस सुद्धा जातीवाचक शिवीगाळ केली यावेळी माझ्या आईने पोलीस केस करण्यासाठी जाते असे सांगून घरात गेली असता उद्धव वरकड हा माझ्या पाठीमागे आमच्या घरात आला व माझ्या आईच्या हाताला धरून ओढले तेव्हा आई खाली पडली व तो म्हणाला की, पोलीस स्टेशनला कशी जाते तुझे हात पाय तोडून ओढ्याला टाकीन अशी धमकी दिली. या तक्रारीच्या आधारे मंठा पोलिसांनी भारतीय दंड संहिता १८६० अन्वये कलम २९४, ३२३, ४५२, ५०४, ५०६,३(१)(r),३(१)(s) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राजू मोरे करीत आहेत.