
दैनिक चालू वार्ता नांदेड उत्तर प्रतिनिधी -समर्थ दादाराव लोखंडे
दिनांक: 20 एप्रिल 2023 रोजी जि. प. कें . प्रा. शा. शेवडी बा. येथे शाळा पूर्वतयारी मेळावा आयोजित करण्यात आलेला होता. यात इयत्ता पहिली ते इयत्ता पाचवी वर्गास अध्यापन करणारे शिक्षक/ शिक्षिका व केंद्रांतर्गत गावातील अंगणवाडी ताई यांची उपस्थिती होती. सदर कार्यक्रमास केंद्राचे केंद्रप्रमुख श्री नागोराव जाधव हे अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मुख्याध्यापक श्री नरवाडे ए. एच . प्रा.शा .दगडगाव चे उच्च श्रेणी मुख्याध्यापक श्री अशोक राऊत सर व प्रा. शा. बेटसांगवी चे मुख्याध्यापक श्री. कोडगिरे सर हे उपस्थित होते. तर सदर प्रशिक्षणाचे सुलभक म्हणून प्रा.शा. पिंपरणवाडी चे मुख्याध्यापक श्री मोरे डी. यु.सर , कें. प्रा. शा. शेवडी बा. च्या स. शि. सौ पिंपळे मॅडम यांनी प्रशिक्षित करण्याचे काम केले.
सदर प्रशिक्षणाची सुरुवात आद्य शिक्षिका क्रांतीज्योती माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते झाले. स्वागत समारंभात अध्यक्ष प्रमुख पाहुणे व सुलभक यांचे स्वागत करण्यात आले. विशेष अभिनंदन पर स्वागतात केंद्रातील पोहण्याच्या स्पर्धेत सुवर्ण पदकास गवसणी घालणारे प्रा.शा. बेटसांगवी चे शिक्षक श्री चंद्रकांत लामदाडे सर, तसेच राष्ट्रीय पातळीवरील नेट परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या प्रा. शा. भेंडेगाव च्या शिक्षिका सौ.भारती राठोड मॅडम यांचे सत्कार करण्यात आला.
प्रशिक्षणाचे प्रास्ताविक श्री गायकवाड बी.बी. सर यांनी केले . सुरुवातीस सुलभक सौ. पिंपळे मॅडम यांनी शाळा पूर्वतयारी मेळाव्यात सात टेबलावरील करावयाच्या नोंदी याबाबत सविस्तर उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच दुसरे सुलभक श्री मोरे डी. यु. सर यांनी वजन- उंची घेऊन शाळेतील पहिले पाऊल या पुस्तकातील उपक्रम प्रत्यक्ष कसे सोडवून घ्यावेत. याबाबत सखोल मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोपात कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्रप्रमुख श्री नागोराव जाधव यांनी अंगणवाडी ताई यांच्याकडून इयत्ता पहिलीच्या शिक्षकांनी प्रवेश पात्र विद्यार्थी यादी हस्तगत करून आधारसह, दुबार प्रवेश होणार नाही. याची काळजी घेऊन प्रवेश यादी तयार करण्याचे आवाहन केले. प्रशिक्षण कालावधीमध्ये दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करून शाळा पूर्वतयारी मेळाव्याचे प्रभावी आयोजन करावे असे देखील सर्वांना सुचित केले. हर घर नर्सरी ,सीड बँक, दीक्षांत समारोप, समर कॅम्प तसेच वार्षिक निकाल तयार करणे इत्यादी प्रशासकीय सूचना देऊन सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शा. जवळा पु. येथील शिक्षक श्री जामकर सर यांनी केले.
प्रशिक्षणाच्या दुसऱ्या सत्रात सर्व प्रशिक्षणार्थ्याच्या सहभागाने शाळा पूर्व मेळावा मिरवणुकीचे प्रत्यक्ष आयोजन केले होते जात ढोल ताशे वाजवून पालक शैक्षणिक जनजागृती नारे देत सात टेबल या हॉलमध्ये होते त्या हॉलचे मान्यवरांच्या हस्ते रिबीन कापून उद्घाटन केले गेले. तदनंतर विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया कशी राबवावी यांचे प्रत्यक्ष सात टेबलवर विविध साहित्य ठेवून विद्यार्थ्यांचे वजन- उंची, पूर्वज्ञान तपासणी, लहान- मोठे , तुलनात्मक संबंध, कमी- जास्त अशी चाचणी करून प्रवेश देण्यात आला . अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात प्रशिक्षण यशस्वी पार पाडण्यात आले. प्रशिक्षणार्थ्यास चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली होती. सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी प्रशिक्षण उत्तम पार पडल्याची प्रतिक्रिया देऊन समाधान व्यक्त केले.