
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:अती तातडीची फीस भरल्यानंतर विहित कालावधीत जमीन मोजमाप करणे अपेक्षित आहे. मात्र भूमी अभिलेख कार्यालयातील निढारलेल्या कर्मचाऱ्यांनी मनमानीचा कळस गाठत अती तातडीची फीस भरून सहा महिन्यांचा कालावधी उठला तरीही जमीन मोजमाप ‘जैसे थे’च आहे. त्यामुळे त्रस्त झालेले शेतकरी सुनील सुधाकरराव देशपांडे यांनी उपरोक्त कार्यालयातील भोंगळ कारभाराची चौकशी करण्याची मागणी वरिष्ठांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
देगलूर उदगीर रोड लगत बिरादार गॅस गोदामाच्या पाठीमागील गट नंबर ६२७ मधील जमीन मोजणी करून नकाशामिळण्यासाठी तक्रारदार सुनील सुधाकरराव देशपांडे यांनी दि. ११ ऑक्टोंबर २०२२ रोजी अर्ज करून त्याच दिवशी अती तातडीचा चलन भरले. तीन महिन्यानंतर अर्थात १० जानेवारी २०२३ रोजी सदरील जमिनीची मोजणी कार्यालयातील कर्मचारी सय्यद इमरान सय्यद इकबाल यांनी सकाळी ९ वा. येतो म्हणून सर्व चर्तुसिमा धारकांना सायंकाळी चार ते पाच वाजेपर्यंत ताटकळत ठेवत कशीबशी मोजणी केली. तीन महिन्यापूर्वी मोजणी केलेल्या जमिनीचा मोजणी नकाशा व हद्द कायम आजतागायत सय्यद इमरान सय्यद एकबाल यांनी करून दिला नाही.
या संदर्भात तक्रारदार देशपांडे यांनीभूमी अभिलेख जिल्हा अधीक्षक यांच्याकडेसय्यद इमरानच्या करारनाम्याचा तपशीलसांगितला असता लागलीच यांनी उपाधिक्षक यांना फोन करून तात्काळ हद्द कायम करून देण्याचे आदेश दिले. उपाधिक्षक यांनी सय्यद इमरान यांना सदरील जमिनीचा नकाशा व हद्द कायम करून देण्याचे सूचित केले. त्यानुसार दि. ०२ एप्रिल रोजी इमरान याने दि. ४ एप्रिलला हद्द कायम करायची असल्यामुळे नोटीस मध्ये नमूद केलेले सर्व साहित्य घेऊन हजर राहावे असे कळविले त्याप्रमाणे सर्व साहित्य व चर्तुरसीमेचे सर्व लोक दि. ४ एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता हजर झाले व सायंकाळी ५ वाजेपर्यंत ताटकळत बसून होते. दुसरीकडे सय्यदइमरान यांनी दि. ३ ते २० एप्रिलपर्यंत अर्जीत रजेचा अर्ज उपाधिक्षक मुखेडयांच्याकडे करून हात वर केले.आर्थिक तडजोड झाली की वेळेवर नाहीतर ‘सरकारी काम सहा महिने थांब’ अशा सदरात मोडणाऱ्या घटनेचा प्रत्यय भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी सय्यद इमरान यांच्या कर्तबगारीतून दिसून येत असल्याचा आरोप करीत. या कर्मचाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करून उपरोक्त जमीन मोजमाप प्रकरणात एवढे दिरंगाई का लावले याची चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी त्रस्त झालेले शेतकरी सुनील देशपांडे यांनी वरिष्ठांकडे लेखी निवेदन द्वारे केली आहे