दैनिक चालु वार्ता कौठा प्रतिनिधी – प्रभाकर पांडे
कौठा ता.कंधार येथे प्रतीवर्षी प्रमाणे याही वर्षी कौठा येथे दिनांक २२ एप्रिल रोजी क्रांतीसुर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज सार्वजनिक जयंती मंडळांच्या वतीने सर्व रोग निदान शिबिर मोटरसायकल रॅली व्याख्यान व सायंकाळी मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले होते.
कंधार तालुक्यातील कौठा येथे क्रांती सुर्य जगंत ज्योती महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त दि २२ एप्रिल रोजी सकाळी १० वा महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व आरोग्य तपासणी शिबिर शुभारंभ डॉ. नितीन अंबेकर डॉ.संदीप ढगे डॉ. मिरा ढगे डॉ. स्वप्नजा चांडोळकर डॉ.योगेश दुलेवाड डॉ.नजमा शेख डॉ.दिशा कांबळे डॉ.शरयू मुलंगे डॉ. अंबिका माटोरे डॉ. सिध्देश्वर मुद्दे डॉ.व्दारकादास शेळके डॉ.नागेश देशमुख परिचारीका वाघमारे डॉ.विरूपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेडकर यांच्या हस्ते झाले यावेळी सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यात तज्ञ डॉक्टर उपस्थित होते सायंकाळी ४ वा व्याख्याता बसवराज पाटील शेळगावकर यांचे महात्मा बसवेश्वर यांच्या जिवनावर व्याख्यानं झाले व सायंकाळी गावच्या मुख्य रस्त्याने भव्य मिरवणूक काढण्यात आली त्यावेळी परिसरातील नागरिकांनी आरोग्य शिबिराचा व जयंती मिरवणूकीत युवकांनी सहभाग नोंदवला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जगतज्योती महात्मा बसवेश्वर जयंती महोत्सव समितीने अथक परिश्रम घेतले व गावकर्यांचे व युवकांचे सहकार्य लाभले.
