दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे
मंठा.. उन्हाची तिव्रता वाढायला लागल्या पासून शहरासह ग्रामीण भागातही ग्रीन नेटची मागणी वाढली आहे. बहुतेकांच्या घरी ग्रीन नेटचे आच्छादन नजरेस पडते. त्यामुळे शहरातील बाजारात परिसरात आणि घरांवरही हिरवी छाया पसरल्याचा भास होत आहे.उन्हाची दाहकता कमी करण्यासाठी गावखेड्यात लाकडी झाडाच्या डहाळीचा मांडव असायचा झाड कमी झाली असल्यामुळे कसलातरी आडोसा असावा लागतो. यासाठी सर्वत्र ग्रीन नेटचा वापर होत आहे.घरासमोर गुराच्या गोठ्यावर घराच्यावर शोभेच्या कुंड्या ठेवलेल्या असतात. या झाडांचे उन्हापासून रक्षण करण्यासाठी संपूर्ण अंगणभर ग्रीन नेटचा वापर केला जात आहे.
वरच्या मजल्यावर तसेच अपार्टमेंटमध्ये राहत असलेल्या नागरिकांच्या घरी गॅलरीतून उन्हाचे झळई वाहतात. गॅलरीत कुलर लावूनही हवेच्या उष्ण झोताने वातावरण तितकेसे थंड होत नसल्याकारणाने ग्रीन नेटचा सर्रास उपयोग होत आहे
