
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे.
मंठा.टेलिकॉम कंपन्यां- नी मोबाइल रिचार्जचे दर वाढविल्यापासून शहरी भागासह ग्रामीण भागातील कमी बजेट असणाऱ्यांचे टेन्शन आणखी वाढले आहे. टेलिकॉम कंपन्यांचे महागडे रिचार्ज प्लॅन स्मार्ट फोन युजरसाठी मोठी समस्या बनली आहे. रिचार्जचे दर सातत्याने वाढत असून मोबाइल रिचार्जचा खर्च आता दुधाइतका होत असल्याचे दिसून येत आहे.
कुटुंबाचा मोबाइल रिचार्ज व इंटरनेट डेटापॅकचा खर्च दुपटीने वाढला आहे. ग्रामीण भागातील अनेक भ्रमणध्वनीधारकांकडे अनेक दिवस मोबाइलमध्ये पैसे नसतात. केवळ एक महिना इनकमिंग सुरू असते. महागाईच्या काळात प्रत्येक आउटगोइंग पूर्णतः बंद असते गरिबाला मोबाईल वापरणे आवाक्या बाहेर झाले आहे.