दैनिक चालु वार्ता प्रतिनिधि –
_______
महात्मा बसवेश्वर महाराजांची जयंती साजरी करत असतांना विचारांची जयंती साजरी केली पाहिजे, महात्मा बसवेश्वरांनी १२ शतकात अनुभव मंडप स्थापन करुन सर्व धर्मांच्या लोकांना कुठलाही भेदभाव न करता जगाला लोकशाहीची शिकवण देत असताना,त्यावेळी त्याच ठिकाणी विचार विनिमय करुन वचन ग्रंथाच काव्यसरुपात रचणा केली गेले.
महात्मा बसवेश्वर आपल्या वचणात सांगतात
चोरी करू नको, हत्या करू नको, खोटे बोलू नको, रागावू नको, इतरांचा तिरस्कार करू नको, दुसऱ्याची निंदा करू नको, हीच अंतरंगशुद्धी, हीच बहिरंगशुद्धी, हेच कुडलसंगमदेवाला प्रसन्न करण्याची रीत आहे.
महात्मा बसवेश्वर कायक वै कैलासची शिकवण दिली. श्रम हेच खरी देव पुजा आहे. प्रत्येकांनी श्रम करुन आपलं उदरनिर्वाह
करावे असे सांगत त्याच बरोबर दासोहची शिकवण पण महात्मा बसवेश्वरांनी दिले.
आज आपण जयंती साजरा करत असतांना महात्मा बसवेश्वर महाराजांचे विचार समाजातील तळा गळा प्रयत्न गेले पाहिजे महात्मा बसवेश्वरांची शिकवण आज सुद्धा आपणास जिवन जगत असतांना अनमोल आहेत. म्हणून प्रत्येक बसवं भक्तांनी प्रत्येक समाज बांधवांनी महात्मा बसवेश्वर महाराजांचे विचार आत्मसात करावे अशे प्रतिपादन बसव व्याख्याते बसवंत पाटील शेळगावकर यांनी केले.
ते कौठा ता.कंधार येथे २२ एप्रिल रोजी क्रांतीसुर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज सार्वजनिक जयंती मंडळांच्या वतीने आयोजित व्याख्यान मध्ये बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सद्गुरू डॉ विरुपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेडकर होते तसेच कार्यक्रमाला डॉ. नितीन अंबेकर डॉ.संदीप ढगे डॉ. मिरा ढगे डॉ. स्वप्नजा चांडोळकर डॉ.योगेश दुलेवाड डॉ.नजमा शेख डॉ.दिशा कांबळे डॉ.शरयू मुलंगे डॉ. अंबिका माटोरे डॉ. सिध्देश्वर मुद्दे डॉ.व्दारकादास शेळके डॉ.नागेश देशमुख परिचारीका वाघमारे आदी उपस्थित होते.यावेळी सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन यावेळी परिसरातील नागरिकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेत, जयंती मिरवणूकीत युवकांनी सहभाग नोंदवला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जगतज्योती महात्मा बसवेश्वर जयंती महोत्सव समितीने अथक परिश्रम घेतले.
