दैनिक चालु वार्ता छत्रपती संभाजीनगर उपसंपादक- मोहन आखाडे
तासगाव ता.सांगली येथे
सामाजिक कार्याबद्दल गुणगौरव पुरस्कार देण्यात आले.
या कार्यक्रमासाठी सिने अभिनेत्री बिगबॉस सीजन फोर ची व मिसेस मुख्यमंत्री टीव्ही मालिका मधील कलाकार सुमि चे पात्र साकारलेली अभिनेत्री अमृता धोंडगे, साध्वी धर्मसिहणी गायत्री दीदी आयुर्वेदाचार्य, राष्ट्रीय अध्यक्ष आयुष भारत चे डॉ.आमीर मुलाणी, डॉ.गणेश पाटील कोविड योद्धा महाराष्ट्र शासन राज्य पुरस्कार प्रमाणित, ह.भ.प.डॉ. मनीषाताई गुरव निसर्गोपचार नाडी परीक्षण तज्ञ, यांच्या हस्ते आयुष भारत डॉक्टर असोसिएशन तर्फे विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ, गुणगौरव पत्र व अकराशे एक रुपये याप्रमाणे देण्यात आले. *श्री नागेश गव्हले यांना सिने अभिनेत्री अमृता यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.*
या कार्यक्रमाला महाराष्ट्रातून विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. छत्रपती संभाजीनगर मधून चार जणांना हा पुरस्कार मिळाला नागेश गव्हले ,महेंद्रकुमार सकलेच्या,उत्तम आसबे, दिलीप आसबे.
सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातूनच डॉक्टर गणेश पाटील यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने येथे साजरा करण्यात आला.
नागेश गव्हले यांनी आतापर्यंत 55 झाडे लावली त्यांचे संगोपन केले. पाच वर्षापासून ते झाडाला पाणी देणे त्यांची काळजी घेणे काम करत आहे.अन्न हे परब्रम्ह आहे ते वाया घालू नये बद्दल प्रबोधन करणे अन्न वाचवा समिती मार्फत शाळा, कॉलेज,लेडीज होस्टेल, मुलांचे होस्टेल, सरकारी ऑफिस, मिनी घाटी चिकलठाणा, लग्न समारंभ ,बर्थडे पार्टी अशा अनेक ठिकाणी अन्न वाचवा, ताटात अन्न उष्टे टाकू नका,अन्ना नासाडी करू नका यासंदर्भात प्रबोधन केले,उपक्रम राबवले झाडे लावा झाडे जगवा, स्वतः सायकल चालवून सायकल चालवा प्रदूषण टाळा शरीर निरोगी करा या संदर्भात पण उपक्रम राबवत आहे, कोरोना काळात पण ॲम्बुलन्स वर ड्रायव्हर म्हणून ड्युटी करून रुग्णांची सेवा केली, कोरंटाईन रुग्णांना त्यांच्या घरी दूध, फळ,भाज्या अन्न घरपोच पुरवले.याप्रकारे पण रुग्णांचे प्राण वाचवण्याचे काम त्यांनी केले
