दैनिक चालु वार्ता कुरुळा सर्कल प्रतिनिधी –चंद्रकांत मोरे
सक्षम राष्ट्र निर्माण करायचे असेल तर राज्यघटनेतील स्वातंत्र्य, समानता,बंधूंत्वाची पायाभरणी नव्या पिढीमध्ये रुजणे आवश्यक आहे.स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतरही ती कितपत रुजली हा आजही आत्मपरीक्षणाचा विषय आहे.राज्यघटनेत शेवटच्या व्यक्तीच्या उत्थानासाठी उदात्त हेतूने विचार केला असला तरीही, बाबासाहेबांच्या पश्चात घटना ज्यांच्या हाती आली त्यांची नियत साफ नसल्यामुळे सामाजिक बंधूत्व रुजविण्यात ७०वर्ष गेली. विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३२वी जयंती मौजे नागलगाव येथे मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
सकाळच्या सत्रात फुले,शाहू, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेंचे पुजन होउन,त्रिशरन,व पंचशील पठण करण्यात आले. पंचशील ध्वजारोहण सरपंच यास्मिन मोहम्मद शेख, उपसरपंच रुक्मिणीबाई त्र्यंबक कुट्टे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी आजी-माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य,सेवा सहकारी सोसायटींचे चेअरमन, तंटामुक्ती अध्यक्ष,शालेय शिक्षण समिती अध्यक्ष, पोलीस पाटील,फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीतील अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना लांडगे म्हणाले की, राजकीय स्वातंत्र्य मिळाले, मतदानाचा हक्क मिळवूनही आपण राजकीय पक्षाचे अप्रत्यक्ष गुलाम बनत आहोत.समाजात राष्ट्रनिष्ठेपेक्षा पक्षनिष्ठा वाढत चालली आहे.लोकशाहित अपेक्षेपेक्षा जास्त बहुमत मिळणारे पक्ष हुकुमशाही जन्मास घालतात.हे लोकशाहीच्या हिताचे नसून, सक्षम राष्ट्र उभारणीसाठी स्वातंत्र्य, सामाजिक समानता, सामाजिक बंधूत्वभावणा ही लोकशाही मुल्ये नव्या पिढीमध्ये रुजवणे गरजेचे आहे.यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संसदीय कामकाज व विधीमंडळातील त्यांच्या शेवटच्या भाषणांचा संदर्भ देत बाबासाहेबांना हवा असलेला नवा भारतीय समाज उभारणे हिच महापुरुषांना आदरांजली ठरेल असे सुतोवाच केले.
सायंकाळच्या सत्रात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राची ढोल ताशाच्या गजरात गावभर मिरवणूक काढण्यात आली.कार्यक्रम यशस्वीतेसाठी भिमजयंती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश ढवळे,तथा गौतम ढवळे, चंद्रकांत मोरे ,विनोद ढवळे, साहेबराव ढवळे, सुनिल गायकवाड,कोयल ढवळे, रतन गायकवाड, अनिल सोनकांबळे,रमेश मोरे, संतोष मोरे,रमेश मोरे,उपासक,उपासीका आदींनी परिश्रम घेतले.
