
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -एकनाथ गाडीवान
देगलूर.तालुक्यातील येरगी येथे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
सर्व प्रथम डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून महावंदन करून ध्वजारोहण करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष हाणमंतराव परमेश देवगीरे येरगीचे सर्वांचे लाडके सरपंच संतोष पाटील, सदस्य गजानन सूर्यवंशी, पुंडलिक वाघमारे,अशोक वाघमारे, विश्वनाथ बागेवार,अशोक बरसमवार,सुरेश सोमवार, तंटामुक्तीचे अध्यक्ष गंगाधर बरसमवार,शालेय समितीचे अध्यक्ष मारोती बरसमवार, उपाध्यक्ष प्रभू सुर्यवंशी,गजानन बरसमवार,मल्लिकार्जुन पाटील, कृष्णा गंटावार,मल्लिकार्जुन कंलिगवार,केरबा कांबळे,सचिन कांबळे,संजय कांबळे,सुभाष सूर्यवंशी,केशव सूर्यवंशी,शंकर वाघमारे,गौतम वाघमारे, जि.प.शा. सर्व कर्मचारी अंगणवाडीत सेविका व तसेच जयभिम मित्र मंडळ आदी मान्यवर उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविले व तसेच भव्य मिरवणूक काढून भजनाचा कार्यक्रम करून समारोप करण्यात आले