
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:देगलूर शहर व परिसरामध्ये ताडीची झाडे नसल्याने तत्कालीन जिल्हा प्रशासनाने या भागातील शिंदी ताडी विक्रीवर निर्बंध आणले होते परंतु येथील काही महाभागांनी या परिसरात पुन्हा शिंदी ताडी विक्रीचे परवाने आणून कृत्रिम रासायनिक शिंदी ताडी निर्माण करून विक्री करीत असल्याने नागरिकांच्या आरोग्याच्या समस्यांसह महाविद्यालयीन तरूण, शाळकरी मुले, मुली या रासायणीक द्रव्याच्या आहारी जातअसल्याचे दिसून येत आहे.देगलूर शहर हे आंध्र आणितेलंगाना राज्याच्या सीमेलगत असल्याने या भागात शिंदी-ताडी प्राशन करणारे नागरिक व महिला मोठ्या प्रमाणात आहेत. दिवसभर काम करून सायंकाळी शिंदी-ताड़ी पिणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. परंतु गेल्या काही वर्षांपूर्वी जिल्हा प्रशासनाने या भागात शिंदी-ताडी ची झाडे नाहीत, तर शिंदी कोणत्या पद्धतिने निर्माण करता हा मुद्दा उपस्थित करून या भागातील शिंदी-ताडी विक्रीवर बंदी घालण्यात आली होती परंतु नंतरच्या काळात देत नाही. म्हणजेच पाच ते सहा वर्षांनंतरदेगलूर शहरातील काही ठेकेदारव्यक्तींनी पुन्हा एकदा शिंदी-ताडीविक्रीचे परवाने काढून या भागातरासायनीक पद्धतीने शिंदी-ताडीनिर्मान करून विक्री करीत आहेत.देगलूर शहर व परिसरात शिंदी व ताडीचे झाडे नसल्याने ही शिंदी-ताड़ी कृत्रिम तथा रासायनिक पदार्थ मिसळुन निर्माण करण्यात येत आहे. पाण्यामध्ये थोडी शिंदी व विविध रासायनिक पदार्थ टाकून शिंदी-ताडी निर्माण करण्यात येऊन ती प्लास्टिक मध्ये विक्री करण्यात येते. याकडे राज्य उत्पादन शुल्क प्रशासन मात्र लक्ष
दररोज येथील मजूर, हमाल,मापाडी व शेतमजूर हे रासायनिकशिंदी-ताडी प्राशन करीतअसल्यानेमधुमेह, रक्तदाब, पोटाच्या व अनेक आरोग्याच्या समस्येची झुंजावे लागत आहे. तर सद्यस्थितीमध्ये महाविद्यालयीन तरूण, शाळकरी मुले, मुली या रासायणीक द्रव्याच्या आहारी जात असल्याचे दिसून येत आहे.. त्यामुळे त्यांच्या जीविताशी खेळ या शिंदी-ताडी विक्री करणाऱ्या ठेकेदारांनी चालविला असल्याचे दिसून येते यामुळे या भागातील शिंदी-ताडी विक्रीवर तात्काळ बंदी आणावी अशी मागणी पालक वर्गातून होत आहे.