दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:देगलूर तालुक्यातील मौजे हणेगाव येथील बालाजी गंगाराम रोयलावार रा. देगलूर यांच्या मालकीचे (उङ-३) सिल श्री देशी दारु दुकान हे धार्मिक स्थळ आरोग्य केंद्र व मानवी वस्तीत असून याचा त्रास या धार्मिक स्थळी देवदर्शनासाठी, आरोग्य केंद्र या ठिकाणी तपासणीसाठी आलेला स्त्रीयांना व पुरुषांना होत असून याची योग्य चौकशी करून या भागातून देशी दारूचे दुकान हटविण्यासाठी दि. २१ मार्च २०२३ रोजी राज्य उत्पादन शुल्क विभाग नांदेड यांना देण्यात आले होते, परंतू या विभागाकडून याचे गांभीर्य लक्षात घेताना दिसत नसल्यामुळे अर्जदार प्रेसनजित जयपाल कांबळे सामाजिक कार्यकर्ता दावणगिरकर यांनी दि. २४ एप्रील २०२३ रोज सोमवारी अकरा वाजता राज्य उत्पादन शुल्क विभाग देगलूर येथे अमरण उपोषणास प्रारंभ केले.
यावेळी अमरण उपोषणास सुरुवात करताना अर्जदार प्रेसनजित कांबळे यांनी राज्य उत्पादन शुल्क अधिकारी नांदेड यांच्यासह उपजिल्हाधिकारी कार्यालय देगलूर, राज्य उत्पादन शुल्क देगलूर पोलिस निरीक्षक पोलिस स्टेशन देगलूर, पोलिस निरीक्षक पोलिस ठाणे मरखेल या सर्व संबंधित अधिकाऱ्यांना लेखी तक्रारी देण्यातआले होते परंतू या तक्रारीची कसल्याच प्रकारची दखल घेतली नसल्यामुळे दि. २४ एप्रील २०२३ रोजी दुय्यम निरिक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग देगलूर या कार्यालयासमोर अमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.
