
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा.दवणे..
मंठा.तालुक्यातील माळेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते माधव चव्हाण यांनी आज (दि. २६) आपला वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानिमित्ताने माळेगाव येथे एक दिवसीय नेत्ररोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या नेत्ररोग निदान शिबिराला माळेगावातील नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.
गावामध्ये वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांना उपचारासाठी अनेकदा तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते. त्यामुळे जेष्ठ नागरिकांना तर बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. त्याचबरोबर दिवसेंदिवस वाढत असलेले डोळ्याचे हा अतिशय गंभीर प्रश्न नागरिकांसमोर आहे. अनेक रुग्ण पैशाअभावी उपचार देखील घेऊ शकत नाही.
म्हणूनच सामाजिक कार्यकर्ते माधव चव्हाण यांनी गावातील नागरिकांची होत असलेली अडचण पाहता त्यांनी आपल्या यंदाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपत गावात एकदिवसीय नेत्ररोग निदान शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी गावातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेऊन मोफत डोळे तपासणी करून घेतले. तसेच पुढील डोळ्यांच्या उपचारासाठी त्यांना मार्गदर्शन देखील केले. यावेळी नागरिकांनी समाधान व्यक्त केले.