
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर:देगलूर तालुक्यातील तुम्बरपल्ली शेतातील पिकाला
पाणी सोडण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर रानडुकराने हल्ला केल्याने शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना तुम्बरपल्ली शिवारात घडली आहे.
देगलूर तालुक्यातील तुम्बरपल्ली येथील शेतकरी बाबुराव मल्लप्पा सलगरे हे बुधवार २६ एप्रिल रोजी पहाटेच्या वेळी आपल्या शेतातील भाजीपाला पिकास पाणी सोडण्यासाठी शेताकडे गेले असता, अचानक रानडुकराने हल्ला करून दोन्ही पायाला चावा घेतला. हातावर, छातीवर सुद्धाजखम झाली आहे. यामुळे शेतकरी गंभीर जखमी झाला असून या घटनेची माहिती येथील सरपंच ज्ञानोबा सलगरे व नातेवाईकांना कळाल्याने त्यांनी त्यास प्रारंभी प्राथमिक आरोग्य केंद्र हणेगाव येथे उपचारार्थ आणले. वैद्यकीय अधिकारी डॉ. पाटील यांनी प्राथमिक उपचार करुन देगलूर येथील रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविले. तद्नंतर नांदेड येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. कृषी सहाय्यक कदम यांनी घटनास्थळी भेट दिली.