
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशान्वे व शिक्षक सेनेचे राज्यध्यक्ष मा.श्री. ज.मो.अभ्यंकर यांच्या शुभ हस्ते नांदेड जिल्यातील प्रभावी शिक्षक नेते शैक्षणिक , सामाजिक,राष्ट्रीय चळवळीमध्ये सदैव अग्रेणीय असलेले शिक्षकाच्या न्याय हक्कासाठी प्रखरपणे लढणारे आधी कर्तव्य आणि न्याय हक्कासाठी सदोदीत झगडणारे नांदेड जिल्ह्यातील प्रभावी शिक्षक नेते ताथा जि.प. प्रा.शा.भाद्रा ता.लोहा या शाळेचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक व विद्यार्थीप्रिय शिक्षक विठुभाऊ चव्हाण यांची महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने या निवडीचे पत्र महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण संचालक तथा महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे राज्य अध्यक्ष मा . ज . मो . अभ्यंकर यांच्या शुभहस्ते प्रधान करण्यात आले. तसेच यावेळी नांदेड जिल्हातील विविध पदाधीकार्यांच्या नियुकत्या प्रदान करण्यात आल्या जिल्हा समनवयक पदी अनिरुद्र शिरसाळकर सर,जिल्हा मार्गदर्शक बळीराम पा.शिंदे जिल्हाऊपाध्यक्ष मुस्तफा शेख सर व जिल्हा सहसचिव बालाजी भांगे याची नियुक्ती करण्यात आली हा कार्यक्रम इंटरनॅशनल स्कुल पश्चिम गोरेगाव मुंबई येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या मुंबई विभागाचे अध्यक्ष मा . अजित चव्हाण , नांदेड जिल्हयाचे अध्यक्ष संतोष अंबुलगेकर सर , जिल्हा सचिव रवि बंडेवार सर यांच्या सह अनेकांची उपस्थिती होती. संघटना बळकट करण्यासाठी व शिक्षकांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी सदैव लढा दया . त्यासाठी संघटना नेहमी खंबीरपणे तुमच्या पाठीशी असेल असा विश्वास राज्य अध्यक्ष मा .ज . मो. अभ्यंकर यांनी दिला . या निवडीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे .