
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा-सुरेश ज्ञा. दवणे..
मंठा..
तालुक्यातील ६ केंद्रप्रमुख व २८ शिक्षकांना मोफत टॅब चे गटशिक्षणाधिकारी अशोक सोळंके यांच्या हस्ते गट साधन केंद्रात नुकतेच वाटप करण्यात आले असून या टॅबलेटचा उपयोग केंद्रप्रमुख यांना संनियंत्रण करण्यासाठी व शिक्षकांना नाविन्यपूर्ण अध्ययन – अध्यापन करण्यासाठी होणार असल्याचे यावेळी श्री सोळंके यांनी प्रतिपादन केले.
समग्र शिक्षा अभियान जिल्हा परिषद जालना यांच्या वतीने वाटप कात्न्यात आलेले हे टॅब शैक्षणिक उपयोगासाठी असून त्याचा वापर खाजगी कामासाठी कोणीही करू नये अशी सूचना जालना डायटचे मंठा तालुका समन्वयक अधिव्याख्याता श्रीहरी दराडे यांनी केली. Samsung Galuxy या नामांकित कंपनीचे A7 Lite Tab मॉडेल प्रत्येकी १४५०० रुपये किंमतीचे असल्याची माहिती शिक्षण विस्तार अधिकारी सतीश शिंदे यांनी दिली.
तालुक्यातील केंद्रीय प्राथमिक शाळा केंधळी येथील ६ शिक्षक, नुतन मंठा उर्दू शाळा येथील ४ शिक्षक, प्राथमिक शाळा अंभोडा कदम येथील ४ शिक्षक, प्राथमिक शाळा देवठाणा उस्वद येथील ४ शिक्षक, केंद्रीय प्राथमिक शाळा विडोळी येथील ५ शिक्षक, प्राथमिक शाळा हेलस येथील ५ शिक्षक अशा २८ शिक्षकांना टॅब चे वितरण करण्यात आले आहे.
यावेळी गटसमन्वयक के. जी. राठोड, केंद्रप्रमुख सर्वश्री कारभारी धोत्रे, तातेराव गायकवाड, के. बी. कांबळे, के. एम. मुळे, भाऊसाहेब जाधव, व्ही. बी. बागल, श्री गौतम वाव्हळ, सदाशिव तोटे, प्रशांत घाडगे, प्रशांत सोनटक्के, जगन गुट्टे, संतोष गीऱ्हे, अभिमान बायस, ज्योती चव्हाण, विद्या पतंगे, सदाशिव बोधने यांची उपस्थिती होती.