
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड- गोविंद पवार
लोहा : लोहा तालुक्यातील उमरा येथे श्री.१०८ महंत सद्गुरु रतनगीर महाराज वै.वैरागी महाराज यांच्या कृपाआशीर्वादाने गुरुवार दि.२७ -एप्रिल ते बुधवार दि.३- मे पर्यंत दत्तनाम पारायण व गुरुचरित्र पारायण आणि रात्री महापूजा दि.३- मे रोजी होमहवन श्री.१०८ महंत सद्गुरु रतनगीर महाराज संजीवन समाधी श्री दत्तात्रय मूर्ती स्थापना व कलशारोहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
तसेच परिसरातील सर्वांचे श्रद्धास्थान असलेल्या कोलंबी मठ संस्थानचे मठाधिपती श्री महंत १०८ सदगुरू गुरुवर्य – यदुबन महाराज, कापशी गुंफा मठ संस्थानचे मठाधिपती श्री महंत १०८ सदगुरू गुरुवर्य – देवगिर महाराज, उमरा खांडी मठाचे मठाधिपती श्री महंत १०८ सदगुरू गुरुवर्य – ईश्वरबन महाराज यांच्या कृपाआशिर्वादाने व मार्गदर्शनाखाली हे कार्यक्रम होणार असून त्यात श्री.हणमंतराव गोविंदराव सिरसाट उमरेकर (उपविभागीय अभियंता सा.बा. उपविभाग – जिंतूर जि.परभणी) यांच्या वतीने श्री.दत्तात्रय मुर्ती स्थापना व त्यांच्या सुविद्या पत्नी सौ.विमलताई हनमंतराव सिरसाट उमरेकर यांचा वतीने होमहावन पुजा करण्यात येणार आहे.तसेच सर्व गावकऱ्यांच्या वतीने कलशारोहण करण्यात येणार आहे.
तरी सर्व साधू, संत व भाविक भक्तांनी या कार्यक्रमास मोठया संख्येने उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त गावकरी मंडळी उमरा यांनी केले असून हा भव्य कार्यक्रम सर्व गावकऱ्यांच्या सहकार्याने साजरा करण्यात येत आहे.