
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे
मंठा
जवाहरलाल नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा जिल्ह्यातील केंद्रा पैकी स्वामी विवेकानंद विद्यालय आणि रेणुका विद्यामंदिर या केंद्रावर एकूण ७४४ विद्यार्थी परीक्षार्थी होते. परीक्षेकरिता प्रवेश पत्र हाती घेऊन विद्यार्थ्यांनी (ता२९) रोजी सकाळी सव्वा दहा वाजेपर्यंत हजर होत कॉपीमुक्त परीक्षा दिली. रेणुका विद्यामंदिर केंद्र क्रमांक ०१, वरती एकूण ३८४ पैकी २१ गैरहजर , केंद्र ०२ स्वामी विवेकानंद विद्यालयांमध्ये ३६० पैकी ६१ गैरहजर होते असे एकूण ७४४ पैकी ८२ विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी गैरहजर होते.
जवाहरलाल नवोदय विद्यालय शैक्षणिक वर्ष २०२३ /२४, करिता परीक्षा सुरळीत मंठा केंद्रावर झाली. ग्रामीण भागातील प्रज्ञावंत विद्यार्थ्यांसाठी नवोदय विद्यालयातर्फे ही परीक्षा घेण्यात येते सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण मिळावे हा त्यामागील उद्देश मंठा तालुक्यातील दोन्ही केंद्रावर परीक्षा सुरळीत कॉपीमुक्त झाली. स्वामी केंद्रावर केंद्र संचालक मुख्याध्यापक बी आर ताठे, नवोदय विद्यालय परतुर पी.पी दुसे यांनी काम पाहिले. तर परीक्षा केंद्रावर उपशिक्षणाधिकारी वडजे मॅडम, गटशिक्षणाधिकारी सोळंके साहेब, गटसमन्वयक के.जी राठोड, केंद्रप्रमुख विष्णू बागल, धोजे सर यांनी भेट दिली. परीक्षा सुरळीत आणि शांत होण्याकरिता सर्व शिक्षक वृंद यांनी सहकार्य केले असून पोलीस बंदोबस्त महसूल विभाग बैठे पथक डि.बी.बेले,
एस.एस उफाड,एस.एस.गादेवाड, पोलीस उपनिरीक्षक असमान शिंदे, एम डी राठोड ,एस बी मार्कड यांनी संरक्षण दिले.