
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर : दिनांक 1 मे 2023 रोजी महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 63 व्या वर्धापन दिनानिमित्त नांदेड येथील पोलीस मुख्यालय कवायत मैदान येथे मुख्य शासकीय ध्वजारोहन संपन्न झाला त्यावेळी देगलूर पोलीस स्टेशनचे दबंग पी एस आय म्हणून ज्यांची देगलूर शहरात
ख्याती आहे असे श्रीकांत मोरे यांचा महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते पोलीस सेवेत मध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल श्रीकांत मोरे यांना
सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आला.
यावेळी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शशिकांत महावरकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, गृहरक्षक दलाचे विजयकुमार यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक व जेष्ठ नागरिक, विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.