
- दैनिक चालु वार्ता उपसंपादक आष्टी-अवधूत शेंद्रे
आष्टी(श)(वर्धा): नियमित पीक कर्ज विहित मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान शासनाकडून दिल्या जाते मात्र बँक ऑफ इंडिया शाखेतील असंख्य शेतकरी या प्रोत्साहन पर अनुदान योजनेपासून वंचित असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी बर करता ब्रह्म हत्या झाल्याच्या भावनेतून आष्टी तहसीलदाराकडे निवेदन सादर केले आहे याबाबत असे की, थकित पीककर्ज शेतकऱ्यांना शासनाने कर्ज मंजुरीचा लाभ दिला आहे अनेक शेतकऱ्यांचे थकीत कर्ज माफ करण्यात आले मात्र दरवर्षी नियमित पीक कर्ज विहित मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर अनुदान म्हणून प्रत्येकी नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यास ५० हजार रुपये अनुदान देण्याची योजना आहे मात्र साहूर येथील बँक ऑफ इंडिया शाखेतील नियमित पीक कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अद्यापही प्रोत्साहन पर अनुदान रक्कम योजनेचा लाभ मिळाला नाही आणि थकीत कर्जदार शेतकऱ्यांना लाखो रुपये कर्ज माफ झाले पण नियमित
कर्जफेड करूनही आम्हाला ५० हजार रुपये अनुदान योजनेचा लाभ मिळाला नाही त्यामुळे बरं करता ब्रह्म हत्या झाल्याची भावना निवेदनकर्त्या शेतकऱ्यांत आहे त्यामुळे शासनाने प्रोत्साहन पर अनुदान योजनेचा लाभ पात्र शेतकऱ्यांना देण्याची विनंती निवेदनातून केली आहे यावर गजानन वरकड,विनोद सोनोने,धनराज सोनोने, चेतन भोरे, लीलाधर अग्रवाल, शालिनी अग्रवाल, प्रभाकर भोरे, मंगल घोटकर,गजानन घाटोळे, रेखा घाटोळे,दीपक काकपूरे,दामोधर पांडे आदी शेतकऱ्यांच्या सह्या आहेत
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची यादी वरिष्ठ स्तरावर पाठवली आहे ज्या शेतकऱ्याचे अनुदान जमा होते आहे त्यांना लाभ मिळत आहे सध्या तरी योजना बंद करण्याचा शासनाचा कोणताही आदेश नाही
विशाल सोसे
कृषी क्षेत्र अधिकारी
बँक ऑफ इंडिया शाखा
साहूर