
दैनिक चालु वार्ता चंद्रपूर जिल्हा उपसंपादक- दीपक कटकोजवार
चंद्रपूर , बल्लारपूर व मुल तालुक्यातील अल्पसंख्याक बहुल भागातील मूलभूत सुविधांचा विकास करण्यासाठी निधी मंजूर झाला आहे. राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नामुळे अल्पसंख्याक भागातील पायाभूत सुविधांचा विकास करण्यात येणार आहे.
मंजुर शासकीय निधी प्रामुख्याने चंद्रपूर तालुक्यातील दुर्गापूर येथे वॉर्ड क्रमांक एक मध्ये सेंट मायकल चर्चची आवारभिंत बांधण्यासाठी 15 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. ऊर्जानगर येथे डब्ल्यूसीएल दुर्गापूर नुरी मदिना मस्जिद व कब्रस्तान येथे पेव्हर्स ब्लॉक व आवारभिंतीचे बांधकाम करण्यासाठी 15 लक्ष रुपयांचा निधी ना. श्री. मुनगंटीवार यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा करत शासनाकडून मंजूर करवुन घेतला आहे.
बल्लारपूर तालुक्यातील कोठारी येथे ईदगाहचे वॉल कम्पाऊंड बांधकाम करण्यासाठी 15 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. विसापूरच्या कबस्तानात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पेव्हर ब्लॉकचे व सीसी रोडचे काम करण्यात येणार आहे. यासाठी 10 लक्ष रुपयांचा निधी ना. श्री. मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे मंजूर झाला आहे.मूल तालुक्यातील डोंगरगाव येथे मुस्लिम समाजासाठी खुला रंगमंच बांधण्यात येणार आहे. यासाठी 10 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. नवेगाव येथील कब्रस्तानलाही 10 लक्ष रुपयांचा निधी खर्च करीत संरक्षक भिंतीचे बांधकाम करण्यात येणार आहे.
मजहब नही सिखाॅंता,आपसमें बैर रखना, हिन्दी हैं हम,वतन है हिंदोस्थाॅं हमारा
जिल्ह्याचे विकासपुरुष नामदार श्री. मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे उपरोक्त विकासकामांसाठी शासकीय निधी मंजूर झाल्याने अल्पसंख्यांक समाजाच्यावतीने पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत.