
दैनिक चालु वार्ता चंद्रपूर जिल्हा उपसंपादक -दीपक कटकोजवार
चंद्रपूर जिल्ह्याच्या भद्रावती येथील हुतात्मा स्मारक जवळ
दि. 6 मे 2023 ला दुपारी ४ वाजता महिला पतंजली समितीच्या पदाधिकारी व साधकांची बैठक प्रमुख अतिथी म्हणून लाभलेल्या महिला पतंजली योग समिती महाराष्ट्र राज्य पुर्व विभागिय प्रभारी आदरणीय सौ. शोभा भागिया यांच्या अध्यक्षतेखाली आणि चंद्रपूर महिला पतंजली च्या जिल्हा महामंत्री सौ.अपर्णा चिडे
जिल्हा संगठनमंत्री सौ.वंदना संतोषवार ,तसेच
भद्रावती तालुका प्रभारी, योग शिक्षिका,योग साधक साधिकांच्या उपस्थित संपन्न झाली. भारतीय संस्कृती नुसार प्रमुख पाहुण्यांचे कुंकुम टिळा लावुन व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले या बैठकीला वरोरा तालुक्यातील पदाधिकारी ,साधक -साधिकाही सहभागी झाले होते.
या बैठकीत प्रामुख्याने -उन्हाळी बाल संस्कार योगा शिबीर, मोटापा,आरोग्य योगा प्राणायाम शिबीर ,योग शिक्षक सहयोग प्रशिक्षण शिबीर ,ऑन लाईन -ऑफ लाइन योगा ,योग केल्यानी होणारे फायदे, शिबिर ,बि.एस.टी ऍप पे दैनिक योग कक्षा चे फोटो , सेवाकार्य या महत्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा करून माहिती देण्यात आली आणि सहयोग शिक्षिकेला प्राणायाम रहस्य, जीवन दर्शन अभ्यासक्रमाच्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले अशाप्रकारे भद्रावती तालुका बैठक हर्षोल्हासाच्या वातावरणात पार पडली . सरतेशेवटी शांती पाठ घेऊन बैठकीचा समारोप करण्यात आला.